दहिहंडी आयोजकांवर कारवाईची टांगती तलवार

By admin | Published: September 9, 2015 12:12 AM2015-09-09T00:12:48+5:302015-09-09T00:12:48+5:30

दहिहंडी स्पर्धेत डीजेच्या माध्यमातून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या दहिहांडी आयोजक व डीजे संचालकांना पोलीस विभागाकडून नोटिशी बजावून जबाब नोंदविण्यासाठी बोलाविण्यात आले आहे.

Action on the Dahihandi Organizers | दहिहंडी आयोजकांवर कारवाईची टांगती तलवार

दहिहंडी आयोजकांवर कारवाईची टांगती तलवार

Next

ध्वनी प्रदूषण प्रकरण : पोलीस विभागाकडून नोटीस
अमरावती : दहिहंडी स्पर्धेत डीजेच्या माध्यमातून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या दहिहांडी आयोजक व डीजे संचालकांना पोलीस विभागाकडून नोटिशी बजावून जबाब नोंदविण्यासाठी बोलाविण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी पोलीस उपायुक्त करणार आहेत. त्यामुळे आयोजक व डीजे संचालकांवर कारवाईची टांगती तलवार आहे.
शहरात रविवारी राजापेठ, राजकमल आणि जयस्तंभ चौकात दहिहंडी स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये युवा स्वाभिमानी, नवयुवक विद्यार्थी संघटना व युवा सेना यांनी दहिहंडीचे आयोजन केले होते. तीनही दहिहंडी स्पर्धेत डीजेच्या तालावर गोविंदांनी दहिहांडी कार्यक्रमाचा आंनद घेतला. या स्पर्धेत डीजेचा आवाज ६५ ते ७५ डेसिबलच्या वर नसावा, अशा सूचना पोलीस विभागाने आयोजक व डीजेच्या संचालकांना दिल्या होत्या. मात्र, स्पर्धेदरम्यान ध्वनी प्रदूषण अधिनियमाचे उल्लंघन झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी ध्वनीची तपासणी केली असता ती ९० डेसिबलच्यावर आढळून आली आहे. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस उपायुक्तांच्या अध्यक्षतेत एक सदस्यीय समिती चौकशी करीत आहे. ध्वनी प्रदूषण अधिनियमाच्या उल्लंघनासाठी पोलीस विभागाकडून सोमवारी दहिहंडी आयोजक व डीजे संचालकाना नोटीस पाठवून जबाबासाठी पोलीस आयुक्तालयात बोलाविण्यात आले आहे. २४ तासांत जबाब नोंदविण्याच्या सूचना पोलिसांनी केल्या आहेत. त्यामुळे दहिहंडी आयोजक व डीजे संचालकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. (प्रतिनीधी)

Web Title: Action on the Dahihandi Organizers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.