महापालिका पथकाची इतवारा परिसरात कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:13 AM2021-05-20T04:13:45+5:302021-05-20T04:13:45+5:30
अमरावती : महापालिका पथकाने बुधवारी इतवारा परिसरात कारवाई करून १७ हजारांचा दंड वसूल केला. यात नोडल अधिकारी पी. एम., ...
अमरावती : महापालिका पथकाने बुधवारी इतवारा परिसरात कारवाई करून १७ हजारांचा दंड वसूल केला. यात नोडल अधिकारी पी. एम., सहायक क्षेत्रिय अधिकारी संजय गंगात्रे, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक विकी जेधे यांच्या उपस्थितीत पठाण चौक, गवळीपुरा, जमील कॉलनी, इतवारा किराणा लाईन, चांदणी चौक, जमील कॉलनी चौक धरमकाटा वलगाव रोड परिसरात पोलीस निरीक्षक अर्जून ठोसरे यांच्या पोलीस पथकासह कारवाई करत असता अपना बेकरी (वलगाव रोड) आस्थापना यांना १३,००० रुपये दंड, आर.टी.पी.सी.आर. रिपोर्ट नसल्याबाबत १००० रुपये प्रमाणे ४,००० रुपये दंड व मास्कबाबत ५०० रुपये असे एकूण १७,५०० रूपये दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेत झोन क्र.५ मधील अभियंता, स्वास्थ्य निरीक्षक, कर निरीक्षक, पोलीस पथक व कर्मचारी सहभागी झाले होते.