जलजीवनचे ८४० ग्रामपंचायतीत तयार होणार कृती आराखडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:12 AM2021-07-25T04:12:42+5:302021-07-25T04:12:42+5:30

अमरावती : ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत कार्यान्वित नळजोडणीव्दारे पाणीपुरवठ्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत २३ जुलै ते ७ ऑगस्टपर्यंत गावकृती आराखडा ...

Action plans of Jaljivan will be prepared in 840 gram panchayats | जलजीवनचे ८४० ग्रामपंचायतीत तयार होणार कृती आराखडे

जलजीवनचे ८४० ग्रामपंचायतीत तयार होणार कृती आराखडे

Next

अमरावती : ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत कार्यान्वित नळजोडणीव्दारे पाणीपुरवठ्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत २३ जुलै ते ७ ऑगस्टपर्यंत गावकृती आराखडा पंधरवडा अभियान राबविण्यात येत आहे. यात ८४० ग्रामपंचायतींमध्ये गावपातळीवर नळजोडणीचा गावकृती आराखडा तयार केला जाणार आहे. २३ जुलै रोजी जलजीवन मिशन राज्य पाणी व स्वच्छता विभागाच्यावतीने ग्रामीण पाणीपुरवठाच्या कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, डाटा एंट्री ऑपरेटर तसेच सनियंत्रण मूल्यमापन सल्लागार यांना झूम ॲपव्दारे गावकृती आराखडाबाबत प्रशिक्षण दिले आहे. यात माहिती संकलन, राबविण्याच्या प्रक्रिया, कोबो टूलव्दारे माहिती अपलोड करणेबाबत धडे दिले आहेत. यानंतर २६ व २७ जुलै या कालावधीत डेप्युटी सीईओ पाणी व स्वच्छता, डेप्युटी सीईओ पंचायत, उपअभियंता, शाखा अभियंता, भूवैज्ञानिक, मनुष्यबळ विकास सल्लागार, सनियंत्रण व मूल्यमापन सल्लागार, पाणी गुणवत्ता सल्लागार व तालुकास्तरावरील बीडीओ, विस्तार अधिकारी पंचायत, उपअभियंता, शाखा अभियंता, गट समन्वयक, समूह समन्वयक यांना झूम ॲपद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

तालुकास्तरावर बीडीओ २८ ते ३१ जुलै दरम्यान प्रशिक्षण घेणार आहेत. यात गाव कृती आराखडाबाबत सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, पंप ऑपरेटर, आशा वर्कर, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीची दोन प्रतिनिधी ना झूम ॲपवर प्रशिक्षण देणार आहेत. गाव पातळीवर १ ते ३ ऑगस्ट या कालावधीत गावकृती आराखडाच्या अनुषंगाने लागणारी माहिती संकलित केली जाणार आहे. यात जिल्हा कक्षातील तज्ज्ञ सल्लागार तालुकास्तरावर बीडीओ, विस्तार अधिकारी पंचायत उपअभियंता, शाखा अभियंता गावपातळीवर ग्रामसेवक, जलसुरक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन सीईओ अविश्यांत पंडा, डेप्युटी सीईओ श्रीराम कुलकर्णी, दिलीप मानकर यांनी केले आहे.

बॉक्स

बॉक्स

मान्यतेसाठी ग्रामसभेत ठेवणार

स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या ग्रामसमृद्धी आभियानात आलेले गाव कृती आराखडे मान्यतेसाठी ठेवले जाणार आहेत. त्यामुळे यासंदर्भातील कामांना प्राधान्य असावे, या सोबतच मधल्या काळात या कृती आराखड्याची पडताळणी केली जाईल. त्यामुळे या अभियानात गाव स्तरावरून मोठा सहभाग असणे आवश्यक असल्याचे सीईओ पंडा यांनी स्पष्ट केले.

Web Title: Action plans of Jaljivan will be prepared in 840 gram panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.