आठ महिन्यांत सहा हजार वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2016 12:54 AM2016-01-01T00:54:37+5:302016-01-01T00:54:37+5:30
आरटीओच्या पथकाने व मोटर वाहन निरीक्षकाने गेल्या वर्षातील ८ महिन्यांत ६ हजार २४२ वाहनांवर कारवाई करून २
संदीप मानकर ल्ल अमरावती
अमरावती : आरटीओच्या पथकाने व मोटर वाहन निरीक्षकाने गेल्या वर्षातील ८ महिन्यांत ६ हजार २४२ वाहनांवर कारवाई करून २ कोटी २८ लाख ४३ हजारांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०१५ दरम्यान करण्यात आली. यामध्ये ६ हजार ५७८ वाहने आरटीओच्या अधिकाऱ्यांनी तपासले. त्यापैकी दोषी आढळलेल्या ६ हजार २४२ वाहन चालकांविरुद्ध केसेस करण्यात आल्या. २४२ वाहने प्रादेशिक परिवाहन कार्यालयात जमा करण्यात आले. यामध्ये १ कोटी ७२ लाख ३० हजार ८६६ ऐवढा दंड असून ४१ लाख ९४ हजार ७१७ रुपये त्यावाहनावरचा चालू कर व १४ लाख १७ हजार ६६६ रुपये थकीत कर असा २ कोटी २८ लाख ४३ हजार २४९ एवढा दंड ठोठावण्यात आला व वसूल करण्यात आला.
या कारवाईमध्ये दुचाकी, चारचाकी वाहने ट्रक, बसेस व इतर वाहनांचा समावेश आहे.ही कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीपाद वाडेकर, उपप्रादेशिक पहिवहन अधिकारी विजय काठोळे यांच्या मार्गदर्शनाखालील सह. प्रादेशिक परिवहन अधिकारी मार्तंड नेवासकर व मोटर वाहन निरीक्षक व सर्व सह. मोटर वाहन निरिक्षकांनी केली. गेल्या आठ महिन्यांत विविध प्रकारच्या कारवाईत २ कोटी २८ लक्ष रुपयांचा दंड वसूल करण्यात आला नवीन वर्षात कारवाईचे मोठे उद्दिष्ट्य राहणार असल्याचे
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी सांगितले.