रेल्वे गाड्यात २४ हजार ३३४ विनापरवाना फेरीवाल्यांवर कारवाई; ३ कोटींचा दंड वसूल

By गणेश वासनिक | Published: December 25, 2023 02:09 PM2023-12-25T14:09:25+5:302023-12-25T14:09:41+5:30

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने राबविली मोहीम, एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या दरम्यान गाड्यांमध्ये तपासणी

Action taken against 24 thousand 334 unlicensed hawkers in railway trains; 3 crores fined | रेल्वे गाड्यात २४ हजार ३३४ विनापरवाना फेरीवाल्यांवर कारवाई; ३ कोटींचा दंड वसूल

रेल्वे गाड्यात २४ हजार ३३४ विनापरवाना फेरीवाल्यांवर कारवाई; ३ कोटींचा दंड वसूल

अमरावती: मध्य रेल्वे विभागाच्या आरपीएफच्या फेरीवाला विरोधी पथकाने एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या दरम्यान धावत्या रेल्वे गाड्या, प्लॅटफार्मवर २४ हजार ३३४ विनापरवाना फेरीवाल्यांवर धडक कारवाई केली असून, ३ कोटी ५ लाखांचा दंड वसूल केला आहे. प्रवाशांच्या सुरक्षितेतसह चांगल्या दर्जाचे खाद्य पदार्थ, पेय मिळावे, यासाठी रेल्वे सुरक्षा बल निरंतरपणे विनापरवाना फेरीवाल्यांवर कारवाई करतात.

 मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या फेरीवाला विरोधी पथकाने अनधिकृत फेरीवाले आणि रेल्वेच्या परिसरात अतिक्रमण करणाऱ्या विनापरवाना फेरीवाल्यांविरुध्द अत्यंत यशस्वी मोहीम राबवली आहे.  ट्रेनमध्ये एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १४४ अंतर्गत २४,३३९ प्रकरणे नोंदवली गेली असून २४,३३४ जणांना अटक केली आहे आणि ३ कोटी ५ लाखांचा . दंड वसूल केला आहे. फेरीवाला उपद्रव आणि बेकायदेशीर गोष्टींना आळा घालण्यासाठी कारवाई करण्यात आली आहे. 

आरपीएफच्या कारवाईवर एक नजर....

• मुंबई विभागात ९३९४ गुन्ह्यांची नोंद झाली असून ९३९३ जणांना अटक करून १ कोटी २ लाखांचा दंड आकारला.  
• भुसावळ विभागाने ७२०६ गुन्हे दाखल असून ७२०५ लोकांना अटक केली आहे. तर १ कोटी २९ लाख दंड वसूल केला. 
• नागपूर विभागात ३१८१ गुन्हे दाखल करण्यात आले आणि ३१७९ जणांना अटक केली असून १ लाखांचा दंड वसूल केला. 
 • पुणे विभागात १९९० गुन्हे दाखल असून १९९१ लोकांना अटक करण्यात आली आहे. १३ लाखा ८८ हजारांचा दंड वसूल केला. 
• सोलापूर विभागाने २५६८ गुन्हे दाखल केले आणि २५६६ लोकांना अटक केली. तसेच २५ लाख ८७ हजारांचा दंड वसूल केला. 

फेरीवाला विरोधी पथकाच्या सततच्या प्रयत्नांनी प्रवाशांची सुरक्षा आणि सुरक्षा सुनिश्चित करताना त्यांचे समर्पण आहे. हे परिणाम रेल्वे नेटवर्कची अखंडता राखण्यासाठी आणि प्रवाशांच्या हिताचे संरक्षण, रेल्वे अधिकारी आणि कायद्याची अंमलबजावणी करणारी बांधिलकी दर्शविणारी आहे.
- जीवन चौधरी, जनसंपर्क अधिकारी, मुंबई

Web Title: Action taken against 24 thousand 334 unlicensed hawkers in railway trains; 3 crores fined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.