५२८ वाहन चालकांना कारवाईचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:14 AM2021-03-05T04:14:18+5:302021-03-05T04:14:18+5:30
अमरावती : लॉकडाऊन कालावधीत शहरात विनाकारण फिरून नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. गुरुवारी ५२८ वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई ...
अमरावती : लॉकडाऊन कालावधीत शहरात विनाकारण फिरून नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. गुरुवारी ५२८ वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करून त्यांना ई-चलानच्या माध्यमातून ९२ हजार ८०० रुपयाचा दंड ठोठावण्यात आला. अनेक वाहनचालकांनी जागेवरच दंडाची रक्कम भरली.
मास्क न लावणे, सामाजिक अंतर न पाळणे तसेच संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर भादंविचे कलम १८८ अंतर्गत गुरुवारी २९ जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले. आतापपर्यंत ७१६ जणांवर गुन्हा नोंदविल्याची माहिती पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी दिली. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पोलीस प्रशासानाच्यावतीने कठोर पाऊल उचलले जात असल्याचे त्या म्हणाल्या. स्वत:चा व इतरांचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी शासन व प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असेही त्या म्हणाल्या.