तालुक्यात जनावर चोरटे सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:17 AM2021-04-30T04:17:04+5:302021-04-30T04:17:04+5:30
अनेकांच्या पोलिसात तक्रारी वरूड : तालुक्यात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक शेतकऱ्यांकडे बैलजोड्या, गाई, म्हशी बकऱ्या, कोंबड्या ...
अनेकांच्या पोलिसात तक्रारी
वरूड : तालुक्यात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक शेतकऱ्यांकडे बैलजोड्या, गाई, म्हशी बकऱ्या, कोंबड्या आहेत. मात्र, अलीकडे जनावरे चोर सक्रिय झाले असून दोन दिवसांत लाखो रुपयांची जनावरे चोरीला गेली आहेत. यात प्रामुख्याने बकऱ्या, बोकूड व गाईंचा समावेश आहे.
उदापूर येथून गोठ्यातील बैलजोडी तर हातुर्णा व वाडेगाव येथून २२ बकऱ्या चार दिवसांपूर्वी चोरीला गेल्या. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी थेट दावे, दोर कापून ती जनावरे वाहनातून लंपास करण्यात येत आहेत. पोलीस दफ्तरी तक्रारी करूनसुद्धा हे चोरटे पोलिसांना आढळून येत नसल्याने शेतकरी तसेच गोपालकांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. पशुधन चोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातून जोर धरू लागली आहे.