ॲक्टिव्ह रुग्ण, देशात जिल्हा सातवा, राज्यात पाचव्या स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:13 AM2021-03-14T04:13:15+5:302021-03-14T04:13:15+5:30
अमरावती : जिह्यात फेब्रुवारीपासून वाढलेला कोरोना संसर्ग अद्यापही कमी झालेला नाही. ॲक्टिव्ह रुग्णसंख्येमुळे सद्यस्थितीत अमरावती जिल्हा देशात सातवा, तर ...
अमरावती : जिह्यात फेब्रुवारीपासून वाढलेला कोरोना संसर्ग अद्यापही कमी झालेला नाही. ॲक्टिव्ह रुग्णसंख्येमुळे सद्यस्थितीत अमरावती जिल्हा देशात सातवा, तर राज्यात पाचव्या स्थानी आहे. आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा आहे. जिल्ह्यात सध्या ५,३२२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी २,३६१ महापालिका क्षेत्रात, तर १,८८३ ग्रामीणमध्ये असल्याची धक्कादायक माहिती आहे.
केंद्र शासनाने शनिवारी ॲक्टिव्ह रुग्ण असलेल्या टॉप टेन जिल्ह्याची यादी जाहीर केली. त्यामध्ये जिल्ह्याचे हे धक्कादायक चित्र समोर आले आहे. या यादीनुसार देशात सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रथम पुणे, नंतर अनुक्रमे नागपूर, ठाणे, मुंबई, बंगळूरू, एर्नामुलम व नंतर अमरावती जिल्ह्याचा नंबर लागतो. यानंतर जळगाव, नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यांचा समावेश आहे. या यादीत दहापैकी आठ जिल्हे महाराष्ट्र राज्यातील आहेत व राज्यातदेखील अमरावती जिल्हा पाचव्या स्थानी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढता असल्याने जिल्हा प्रशासनाने चार महिन्यांपूर्वी ‘होम आयसोलेशन’ ही सुविधा ज्या रुग्णांकडे स्वतंत्र खोली व प्रसाधनगृह आहे व खासगी डॉक्टर उपचार करण्यास तयार आहे अशा रुग्णांना देण्यात आलेली आहे व असिम्टोमॅटिक रुग्णांना देण्यात आलेल्या याच सुविधेमुळे आरोग्य यंत्रणेची खैर राखली व याच रुग्णांमुळे अलीकडे अनेक कुटुंबे पॉझिटिव्ह आलेली आहेत. सध्या ४६ रुग्णालयांत कोरोना संसर्गाचे रुग्णावर उपचार करण्यात येत आहे. यात ३,११४ बेडची संख्या आहे. यामधील सध्या १,०९१ बेेड रुग्णांनी व्याप्त आहे, तर २,०२३ शिल्लक आहे. ‘होम आयसोलेशन’ची सुविधा नसली तर या कोरोनाच्या धमाक्यात जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेची वाट लागली, हेदेखील तेवढेच खरे आहे.
पाईंटर
ॲक्टिव्ह रुग्णसंख्येची जिल्हास्थिती
६ मार्च : ६,९६८
७ मार्च : ६,६६३
८ मार्च : ६,४४९
९ मार्च : ५,८७५
१० मार्च : ५,७३०
११ मार्च : ५,५५५
१२ मार्च : ५,३३२
१३ मार्च : ००००
बॉक्स
लाॉकडाऊननंतर संसर्गात काहीअंशी कमी
जिल्हाधिकाऱ्यांनी २२ फेब्रुवारीनंतर दोन वेळा लॉकडाऊन घोषित केले. त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसून येत आहे. त्यावेळी जिल्ह्यात रोज कोरोना रुग्णांची संख्या ९०० क्राॅस झालेली होती. आता लॉकडाऊननंतर रोज ५०० दरम्यान अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. सुपरस्प्रेडर १२ दिवस रोखल्याने कोरोनाग्रस्तांच्या संख्येतही घट आली व आरोग्य यंत्रणेवरचा ताणही काहीसा कमी झालेला आहे.
बॉक्स
चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हिटी वाढतीच
कोरोना चाचण्यांच्या संख्येत आता काहीसी कमी आलेली आहे. दोन आठवड्यांपूर्वी २५०० दररोज चाचण्या व्हायच्या, त्यात आता कमी आलेली आहे. या आठवड्यात सोमवारी १,९५६, मंगळवारी १,२७४, बुधवारी २,१०५, गुरुवारी २,२६८, शुक्रवारी १,७९२ व शनिवारी ०००० चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये शुक्रवारी २५ टक्के व शनिवारी ०००० टक्के पॉझिटिव्हिटी राहिली आहे.
कोट
००००००
०००००००००००
शैलेश नवाल
जिल्हाधिकारी, अमरावती