सक्रिय रुग्ण घटले, तीन तालुके कोरोनामुक्तीच्या वाटेवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:16 AM2021-06-16T04:16:07+5:302021-06-16T04:16:07+5:30

अमरावती : जिल्ह्याच्या सात तालुक्यांत एप्रिल महिन्यापासून कोरोना संसर्गाचा ब्लास्ट झाला होता. प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळाल्याने आता दोन ...

Active patients dropped, three talukas on the way to coronation! | सक्रिय रुग्ण घटले, तीन तालुके कोरोनामुक्तीच्या वाटेवर !

सक्रिय रुग्ण घटले, तीन तालुके कोरोनामुक्तीच्या वाटेवर !

Next

अमरावती : जिल्ह्याच्या सात तालुक्यांत एप्रिल महिन्यापासून कोरोना संसर्गाचा ब्लास्ट झाला होता. प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळाल्याने आता दोन आठवड्यांपासून कोरोनाचा ग्राफ माघारला आहे. संसर्ग कमी झाला आहे. जिल्ह्याचा आरोग्य विभागाच्या सोबतीला ग्राम समितीचे सहकार्य असल्याने सक्रिय रुग्ण घटले आहेत. सद्यस्थितीत ग्रामीणमध्ये १,४०४ संक्रमित आहेत. चिखलदरा, अचलपूर व भातकुली तालुक्यात सक्रिय रुग्णसंख्या कमी असल्याने या तीन तालुक्यांत कोरोना नियंत्रणात येऊ शकतो, असे आरोग्य विभागाने सांगितले.

पाईंटर

तालुकानिहाय ॲक्टिव्ह रुग्ण

अमरावती : ८५

भातकुली : ३४

मोर्शी : १६७

वरूड : १५१

अंजनगाव सुर्जी : ७८

अचलपूर : ३४

चांदूर रेल्वे : ११२

चांदूर बाजार : ७०

चिखलदरा : १३

धारणी : ११२

दर्यापूर : ११४

धाामणगाव : १२१

तिवसा : १२८

नांदगाव खंडेश्वर : १८५

आतापर्यंत झालेल्या चाचण्या : ३,९५,०२२

बाधित होण्याचे प्रमाण (टक्के) : ०२

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (टक्के) : ९६.४९

बॉक्स

अनलॉकनंतर तीन तालुक्यांत वाढले रुग्ण

जिल्ह्यात संचारबंदीत शिथिलता देण्यापूर्वी जिल्ह्यात अचलपूर, वरुड, मोर्शी, तिवसा व धारणी या तालुक्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होती. मात्र, निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर अंजनगाव सुर्जी, दर्यापूर व चांदूर बाजार तालुक्यात रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. त्रिसूत्रीसह कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन केले नसल्याचा हा परिणाम आहे.

पाईंटर

एकूण रुग्ण : ९५,०६०

बरे झालेले रुग्ण : ९१,७२२

उपचार सुरु रुग्ण : १,८१३

मृत : १,५२५

जिल्ह्याचा रिकव्हरी रेट : ९६.४९

कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर तालुके : ०३

Web Title: Active patients dropped, three talukas on the way to coronation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.