अभिनेता गोविंदाचा 'रोड शो' अन् दर्शकांशी संवाद

By admin | Published: September 7, 2015 12:31 AM2015-09-07T00:31:21+5:302015-09-07T00:31:21+5:30

आ. रवी राणा द्वारा स्थापित युवा स्वाभिमान संघटनेच्यावतीने येथील राजापेठ चौकात आयोजित दहीहंडी स्पर्धेकरिता अभिनेता गोंविदा यांना रविवारी आमंत्रित करण्यात आले होते

Actor Govinda's 'Roadshow' and dialogues with viewers | अभिनेता गोविंदाचा 'रोड शो' अन् दर्शकांशी संवाद

अभिनेता गोविंदाचा 'रोड शो' अन् दर्शकांशी संवाद

Next

अमरावती : आ. रवी राणा द्वारा स्थापित युवा स्वाभिमान संघटनेच्यावतीने येथील राजापेठ चौकात आयोजित दहीहंडी स्पर्धेकरिता अभिनेता गोंविदा यांना रविवारी आमंत्रित करण्यात आले होते. दरम्यान साईनगर येथे साई-गजानन प्रवेशव्दाराचे लोकार्पण अभिनेता गोंविदा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी साईमंदिरात अभिनेता गोंविदा यांच्या हस्ते राज्यात पाऊस पडावा, यासाठी महाआरती करण्यात आली. साईनगर ते राजापेठदरम्यान गोंविदा यांचा 'रोड शो' झाला. खुल्या जीपगाडीने अभिनेता गोंविदा याचे दहीहंडी स्पर्धास्थळी आगमन झाले. पांढऱ्या रंगाचा कोट, काळी पँट परिधान केलेल्या गोंविदाने दर्शकांशी संवाद साधला. बालकांप्रति प्रेम व्यक्त केले. अभिनेता गोंिवदाने काही गाण्यांवर नृत्य तर गाणे गावून शहरवासीयांची मने जिंकली. यावेळी गोंविदाने चित्रपटसृष्टीतील २९ वर्षांच्या करिअरचा आलेख मांडला. जनतेच्या प्रेमापोटीच चित्रपटसृष्टीत कायम असल्याचे त्यांनी मान्य केले. यावेळी आ. रवी राणा, नवनीत राणा, लप्पी लाजोदिया आदी उपस्थित होते.

Web Title: Actor Govinda's 'Roadshow' and dialogues with viewers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.