आॅनलाईन प्रवेशात अडसर

By admin | Published: June 19, 2017 12:17 AM2017-06-19T00:17:29+5:302017-06-19T00:17:29+5:30

कधी विजेचा तुटवडा, तर कधी तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली ग्राहकांना घाम फोडणाऱ्या महावितरणद्वारे केल्या जाणाऱ्या ...

Adblock online access | आॅनलाईन प्रवेशात अडसर

आॅनलाईन प्रवेशात अडसर

Next

भारनियमनाचा त्रास : महावितरणचा मनमानी कारभार
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कधी विजेचा तुटवडा, तर कधी तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली ग्राहकांना घाम फोडणाऱ्या महावितरणद्वारे केल्या जाणाऱ्या अघोषित भारनियमनामुळे आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेतही अडसर निर्माण होत आहे. सद्यस्थितीत शहरातील शेकडो विद्यार्थी महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज करीत असून, बारावीचा निकाल जाहीर झाल्यामुळे तंत्र व उच्चशिक्षणाची प्रवेशप्रक्रियाही सुरू झाली आहे. यामुळे विद्यार्थी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.
बारावीच्या गुणपत्रिका हातात मिळाल्यानंतर विविध विद्याशाखांच्या आॅनलाईन प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ वाढला असून, यंदापासून अकरावीची प्रवेशप्रक्रियाही आॅनलाइन करण्यात आली आहे.
जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी अभियांत्रिकी व औषधी निर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी आॅनलाईन अर्ज करणार आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. शहर व जिल्ह्यात अनेक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू असताना विजेचा लपंडाव सुरूच असल्याने विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज करताना अडचणी येत आहेत.
काही ठिकाणी इन्व्हर्टर तथा जनरेटरचा वापर होत असला तरी अशी व्यवस्था नसलेल्या केंद्रांवर विद्यार्थ्यांचे हात होत आहेत.
मागील काही दिवसांपासून शहरातील विविध भागात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज भरताना अडचणी निर्माण होत आहेत.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फटका
भारनियमनाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. तालुक्याच्या ठिकाणी आॅनलाईन अर्ज सादर करण्यास आलेल्या विद्यार्थ्यांना सततच्या भारनियमनामुळे प्रवेशाचे अर्ज सादर करणे कठीण झाले आहे. काही दिवसांपासून शहरी भागातील महावितरणने अघोषित भारनियमन लागू केल्यामुळे विद्यार्थ्यांसह सायबर कॅफेचे संचालक हैराण झाले आहेत. वीज वितरण कंपनीच्या भरवशावर आॅनलाईन सेंटर चालविणाऱ्या संचालकांना हल्ली अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. इयत्ता अकरावी, बारावी, अभियांत्रिकी, फॉर्मसी, पदवी परीक्षांचे प्रवेशपत्र आॅनलाईन सादर करावे लागत आहे. मात्र विजेअभावी आॅनलाईन प्रक्रिया ठप्प राहत असल्याने सायबर कॅफे सेंटरवर विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी ही नित्याचीच बाब झाली आहे. निश्चित कालावधीत आॅनलाईन प्रवेशपत्र सादर करावयाचे असल्याने विजेच्या लपंडावामुळे विद्यार्थ्यांना सर्वाधिक फटका बसत असल्याचे चित्र आहे.

Web Title: Adblock online access

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.