बडनेरा येथे पाण्याच्या टाकीसाठी १४ कोटी जमा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2016 12:07 AM2016-06-19T00:07:17+5:302016-06-19T00:07:17+5:30
केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत महापालिकेला प्राप्त झालेल्या १२२ कोटींपैकी १४ कोटी रुपये बडनेरा मतदारसंघातील
राणांच्या सूचना : विश्रामगृहात बैठक
अमरावती : केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत महापालिकेला प्राप्त झालेल्या १२२ कोटींपैकी १४ कोटी रुपये बडनेरा मतदारसंघातील पाण्याच्या टाकीसह १० अन्य टाक्या उभारण्यासाठी निधी जीवन प्राधिकरणाला द्यावे, असे निर्देश आ. रवि राणा यांनी महापालिका आयुक्त हेमंत पवार यांना शनिवारी येथील शासकीय विश्रामगृहात दिले.
यावेळी बडनेरा मतदार संघातील पाण्याच्या टाकीसह, सांस्कृतिक भवन, शादीखाना हॉल व विविध प्रस्तावित विकास कामासंदर्भात आ. राणा यांनी आयुक्तांशी चर्चा केली. त्यांनी सतत पाठपुरावा करुन मतदार संघात विविध विकासात्मक कामे खेचून आणली. छत्री तलावासाठी मंजूर २५ कोटींपैकी ८ कोटी रुपयांच्या निधीतून छत्री तलाव गार्डनच्या नाना- नानी पार्कमध्ये यु. के.ट्रेन फिरणार असल्याचे सांगण्यात आले. सांस्कृतिक भवनसाठी १ कोटी ७५ , लखांचा निधी मंजूर असून तीन महिन्यानंतरही या कामाला सुरुवात झाली नाही. हे काम त्वरित सुरु करावे असे ४८ आ. राणा यांनी अधिकाऱ्यांना दिले. बैठकीला कार्यकारी अभियंता अनंत पोतदार, शहर अभियंता जीवन सदार, कांबळे, प्रमोद येवतीकर आदी उपस्थित होते.