मराठा आरक्षणात कुणबी समाजाला समाविष्ट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 10:59 PM2019-06-29T22:59:24+5:302019-06-29T22:59:40+5:30

मराठा आरक्षणात कुणबी जातीलाही सामाविष्ट करावे, अशी मागणी शनिवारी पत्रपरिषदेत सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी मराठा समाजाला आरक्षण देणाºया राज्य सरकारचे आभार मानले.

Add to the Kunbi community in Maratha reservation | मराठा आरक्षणात कुणबी समाजाला समाविष्ट करा

मराठा आरक्षणात कुणबी समाजाला समाविष्ट करा

googlenewsNext
ठळक मुद्देपत्रपरिषद । सकल मराठा समाजाची मागणी, मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मराठा आरक्षणात कुणबी जातीलाही सामाविष्ट करावे, अशी मागणी शनिवारी पत्रपरिषदेत सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी मराठा समाजाला आरक्षण देणाºया राज्य सरकारचे आभार मानले.
९ आॅगस्ट २०१६ रोजी मराठा क्रांती मूक मोर्चाची सुरुवात झाली आणि महाराष्ट्रासह देशात विविध ठिकाणी मराठा समाजाचे ५८ मोर्चे निघाले. त्याची फलश्रुती म्हणून शासन निर्णय न्यायालयात कायम राहत मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीत अनुक्रमे १३ आणि १२ टक्के आरक्षण मिळाल्याचे नितीन देशमुख म्हणाले. मराठा हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. हे सिद्ध झाल्याने जवळपास साडेचार कोटी समाजबांधवांना आरक्षण मिळाले. यात राज्य मागास आयोगाने महत्त्वाची भूमिका बजावली. यापूर्वी मंडळ आयोग, राष्ट्रीय मागास आयोग, खत्री आयोग आणि बापट आयोगाला जे जमले नाही ते काम एम.जी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सफल झाल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक नितीन पवित्रकार यांनी सांगितले. यामध्ये जे पुरावे त्यांनी गोळा केले, त्यात महत्त्वाचा भाग म्हणजे कुणबी आणि मराठा समाज एकच आहे. यामध्ये कुणबी आणि मराठा असलेल्या परिवाराच्या रोटी-बेटीचे व्यवहार आहेत. हेसुद्धा आयोगाने स्पष्ट केले. याचाच अर्थ कुणबी व मराठा यात भेद नाही. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या सांगण्यावरून विदर्भातील मराठा समाज आपल्या कागतपत्रात कुणबी लिहू लागल्याने त्याला उर्वरित महाराष्ट्रातील मराठा समाजासारखा संघर्ष करावा लागला नाही. कुणबी समाजाला आरक्षण हेदेखील मंडल आयोगानुसार मिळाले, त्यापूर्वी बिगर आरक्षित होता.
आता शासनाने मराठा समाजाला आरक्षण देऊन आणि न्यायालयात योग्य बाजू मांडून त्याच आनुषंगाने कुणबी घटकाला मराठा आरक्षणाच्या प्रवर्गात आणावे, अशी मागणी सकल मराठा समाज अमरावती यांच्यावतीने करण्यात येत आहे. यासंदर्भात लवकरच मुख्ंयमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी सुरेश धोटे, नितीन देशमुख, बंडोपंत भुयार, छाया देशमुख, स्वप्निल धोेटे, अमोल देशमुख रुपेश सवाई,महेश तºहाळ, राजेंद्र ठाकरे, विशाल पवार, स्वराज ठाकरे, नितीन धर्माळे, राहूल इंगळे, आकाश वडतकर, रोशन घोरमाडे, अंकुश डहाणे, भुषण काळे वैभव देशमुख, गिरीश सोळंके, राजू पाटील आदी उपस्थित होते.
वसतिगृह योजना कुणबी समाजालाही लागू करा
मराठा क्रांती मोर्चाच्या जवळपास २० मागण्या होत्या. त्यातील शैक्षणिक आणि आर्थिक सुविधा मान्य केल्या. मात्र त्या केवळ मराठा समाजाला लागू केल्याने कुणबी समाज वंचित राहिला. शासनाने मागील काळात निर्गमित केलेले व येत्या काळात जाहीर होणाºया शासन निर्णयात मराठा, कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा असा उल्लेख करावा. जेणे करून या योजना विदर्भात चांगल्या पद्धतीने राबविल्या जातील. स्व. संजय बंड यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सकल मराठा समाजाच्यावतीने स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र विद्यार्थ्यांना उपलब्ध करण्याचे काम सुरु असल्याचे नितीन देशमुख म्हणाले.

Web Title: Add to the Kunbi community in Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.