विकासासाठी मिळणार अतिरिक्त ५० लाख
By admin | Published: January 19, 2015 11:57 PM2015-01-19T23:57:45+5:302015-01-19T23:57:45+5:30
विधानसभा सदस्याला सन २०१४-२०१५ या आर्थिक वर्षातसाठी सर्व आमदारांना सुमारे १४६ कोटी रूपयांचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये प्रत्येक आमदारांना ५० लाख
अमरावती : विधानसभा सदस्याला सन २०१४-२०१५ या आर्थिक वर्षातसाठी सर्व आमदारांना सुमारे १४६ कोटी रूपयांचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये प्रत्येक आमदारांना ५० लाख रूपयांचा अतिरिक्त निधी विकास कामांसाठी दिला जाणार आहे.
आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत प्रत्येक आर्थिक वर्षासाठी मतदारसंघाच्या विकासासाठी वार्षिक प्रत्येकी विधानसभा मतदारसंघाच्या विकासकामांसाठी दोन कोटी रूपये दिले जातात .
यंदा दृष्काळाचा सामना करावा लागत आहे. बहुतांश गावांत पाणी टंचाई राहणार असल्याने लोकांची गरज लक्षात घेता पाणी पुरवठ्यावर हा अतिरिक्त निधी खर्च करु. जी कामे योजनेतून होत नाही ती सामावून घेणार.
- वीरेंद्र जगताप, आमदार, धामणगाव
व्यायाम शाळा व जिल्हा परिषद शाळा, जलयुक्त शिवार अभियानांच्या योजनांच्या कामांना गती देऊन त्यात अतिरिक्त निधीच्या माध्यमातून कामे करणार आहेत. पाणंद रस्ते सभागृह बांधकाम व रस्ते कामांवर भर राहील.
- बच्चू कडू, आमदार अचलपूर.