अतिरिक्त सीईओंना मारहाण प्रकरणी झेडपीत काम बंद

By admin | Published: August 12, 2016 12:13 AM2016-08-12T00:13:22+5:302016-08-12T00:13:22+5:30

औरंगाबाद जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीईओ सुरेश वेदमुथा यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ गुरूवारी जि.प. अधिकारी

Additional CEOs stopped work in ZP in the case of assault | अतिरिक्त सीईओंना मारहाण प्रकरणी झेडपीत काम बंद

अतिरिक्त सीईओंना मारहाण प्रकरणी झेडपीत काम बंद

Next

आंदोलन : औरंगाबाद येथील घटनेचा निषेध
अमरावती : औरंगाबाद जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीईओ सुरेश वेदमुथा यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ गुरूवारी जि.प. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. यामुळे कामकाज प्रभावीत झाले होते.
८ आॅगस्ट रोजी वेदमुथा यांना औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षांच्या दालनात सदस्य संभाजी डोणगावकर यांनी अर्वाच्च शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली होती. या घटनेच्या निषेधार्थ जि.प. व पं. स. मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ११ आॅगस्ट रोजी कामबंद आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनात महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित महासंघाचे नेतृत्वात जिल्हा परिषदेच्या प्रवेशव्दारासमोर निषेध सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी डेप्युटी सीईओ जे.एन आभाळे होते. आंदोलनाला जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे पंकज गुल्हाने, ग्रामसेवक युनियनचे कमलाकर वणवे आदींनी पाठिंबा देऊन आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. यावेळी मनीष पंचगाम कॅफो चंद्रशेखर खंडारे, राजेंद्र खैरनार, कार्यकारी अभियंता पी.पी. पोटफोेडे, उपअभियंता आनंद दासवत, प्रदीप ढेरे, ज्ञानेश्र्वर घाटे, श्रीकांत मेश्राम, प्रशांत धर्माळे, जयेश वरखडे, प्रमोद ताडे, राजेश रोंघे, लिलाधर नांदे, अमोल कावरे, नितीन माहोरे, रूपेश देशमुख, समीर लांडे, नीलेश तालन, पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Additional CEOs stopped work in ZP in the case of assault

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.