सुभाष नागरे ‘केम’चे प्रभारी अतिरिक्त प्रकल्प संचालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 10:07 PM2018-02-03T22:07:46+5:302018-02-03T22:08:10+5:30
विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांच्याकडे समन्वयित कृषी समृद्धी प्रकल्पाच्या (केम) अतिरिक्त प्रकल्प संचालकांचा पदभार सोपविण्यात आला.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांच्याकडे समन्वयित कृषी समृद्धी प्रकल्पाच्या (केम) अतिरिक्त प्रकल्प संचालकांचा पदभार सोपविण्यात आला. यापूर्वी प्रकल्पाचे अतिरिक्त प्रकल्प संचालक अजय कुळकर्णी होते.
प्रकल्पाचे मुख्य संचालक विभागीय आयुक्त पीयूष सिंह आहेत. विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांतील शेतकºयांना नैराश्यातून बाहेर काढणे आणि शेतीपूरक सोयीसुविधा देत त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या हेतूने महाराष्टÑ शासन, सर रतन टाटा ट्रस्ट व आंतरराष्टÑीय कृषी विकास निधीतर्फे हा उपक्रम पाच वर्षांसाठी २००९ मध्ये हाती घेण्यात आला. प्रकल्पाला पुन्हा एक वर्षे मुदतवाढ देण्यात आलेली असल्याने प्रकल्पाचे हे अंतिम वर्ष आहे.
प्रकल्प अंतर्गत राबविण्यात आलेल्या योजना भविष्यात कृषी विभागाकडे वर्ग केल्या जाणार असल्याने या प्रकल्पाच्या उर्वरित कामकाजासाठी विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांना अतिरिक्त प्रकल्प संचालकाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे.