आदिवासी, गोवारींचे कलेक्ट्रेटसमोर अन्न, देहत्याग आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 10:09 PM2018-12-15T22:09:38+5:302018-12-15T22:09:57+5:30
गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा चार महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाने दिला. मात्र, अद्यापही शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी गोवारी समन्वय समितीद्वारा शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्न व देहत्याग आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती :गोवारी ही आदिवासी जमात असल्याचा स्पष्ट निर्वाळा चार महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाने दिला. मात्र, अद्यापही शासकीय अध्यादेश काढला नसल्याने आदिवासी गोवारी समन्वय समितीद्वारा शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्न व देहत्याग आंदोलन करण्यात आले.
पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी या आंदोलनाला भेट दिली. आठ दिवसांत मुख्यमंत्री यावर शासकीय बैठक घेणार असल्याचे लेखी आश्वासन मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी संदीप जोशी यांनी नागपुरातील आंदोलनादरम्यान दिली होती. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. आदिवासी गोवारी समाज हा न्याय्य हक्काचा लढा मागील चार दशकांपासून लढत आहे. ११४ गोवारी बांधव या लढ्यासाठी शहीद झाले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १४ आॅगस्ट रोजी निर्णय देऊन गोवारी जमात ही आदिवासी असल्याचा स्पष्ट निर्वाळा दिला. राज्य सरकारने याची त्वरित अंमलबजावणी करावी, असे निर्णयात म्हटले. मात्र, या निर्णयाला चार महिने पूर्ण होत असताना शासनाने अद्यापही न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही. याच्या निषेधार्थ हे आंदोलन राज्यासह समन्वयक मारोतराव वाघाडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. सायंकाळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून आमदार सुनील देशमुख यांनी उपोषणकर्त्यांना निबंू शरबत देऊन उपोषण सोडविले.
जिल्हा समन्वयक पुंडलिक चामलोट, सूर्यभान सहारे आदिवासी गोवारी युवा शक्तीचे नंदू सहारे, कृष्णा चौधरी, देविदास बासकवर, ेरामकृष्ण भाले, उत्तमराव ठाकरे, शिवाजी बर्डे, शंकर नेवारे, रामभाऊ शेंद्रे, शिवा लसवनते, पंकज नेवारे, चंद्रशेखर नेवारे, प्रफुल्ल नागोसे, शिवाजी बर्डे, सहादेव नेवारे, रामकृष्ण गधंभाले, रमेश गजबे, प्रवीण नेवारे, कैलास नेवारे, मंगेश चौधरी सीताराम वाघाडे, कुंडलिक नेवारे, देविदास भोयर, महादेव सोनवणे, चित्रा सूर्यवंशी, जगन्नाथ नेवारे, देवमन राऊत, मधुकर सर्वडे, मारुती मेश्राम, भगीरथ नेवारे, ज्ञानेश्वर ओके, अनिल नेवारे, पांडुरंग नेवारे, प्रभाकर नेवारे, प्रवीण चौधरी पुंडलिक रमेश वाघाडे, रामभाऊ शेंद्रे, प्रफुल्ल नागोसे, रघुनाथ नेवारे, काशीराम सहारे, संजय काळसर्पे, रमेश सोनवणे, पांडुरंग सहारे, सुशील नेहारे, प्रकाश नेहारे चंद्रशेखर नेहारे, राजेंद्र घाटोळे, गोविंद केंद्रे, विकास राऊत, कुंदन चौधरी आदी यात सहभागी होते.