काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेवरून सभा स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2016 12:13 AM2016-02-24T00:13:07+5:302016-02-24T00:13:07+5:30

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या सूचेनवरून महापालिकेत मंगळवारी आयोजित आमसभा स्थगित करण्यात आली.

The adjournment adjourned on the notice of Congress State President | काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेवरून सभा स्थगित

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेवरून सभा स्थगित

Next

‘स्थायी’चा वाद : खोडकेंना निरोप तर शेखावतांना ‘मॅसेज’
अमरावती : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या सूचेनवरून महापालिकेत मंगळवारी आयोजित आमसभा स्थगित करण्यात आली. तत्पूर्वी याबाबत खा. चव्हाण यांनी संजय खोडके यांना निरोप देऊन, तर बबलू शेखावत मोबाईलवर मेसेज पाठविला होता, हे विशेष. स्थायी समिती सदस्य निवडीवरून काँग्रेसमध्ये उफाळलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर ही आमसभा स्थगित करण्यात आली.
महापालिकेत स्थायी समिती सदस्य निवडीवरुन सर्वच पक्षांत कमालीची स्पर्धा आहे. परंतु काँग्रेसमध्ये मोठी रस्सीखेच सुरू आहे. मंगळवारच्या आमसभेत नव्या आठ सदस्यांची निवड अपेक्षित होती. मात्र, सकाळी ११ वाजता वंदे मातरम्ने सभा सुरू होताच लगेच दुसऱ्या क्षणी राष्ट्रवादी फ्रंटचे गटनेता अविनाश मार्डीकर यांनी महापौरांना नागपूर येथे पक्ष बैठकीला जायचे कारण सांगून आमसभा स्थगित करण्याचा प्रस्ताव ठेवला. प्रस्तावाला रिपाइं- जनविकासचे गटनेता प्रकाश बनसोड, चेतन पवार यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर महापौर नंदा यांनी दोन दिवसांनी पुन्हा आमसभा घेण्याचा निर्णय घेऊन सभागृहातून बहिर्गमन केले. ११ वाजता सुरू झालेली आमसभा अवघ्या ७ मिनिटांत गुंडाळली गेली. सभा स्थगित होताच महापौर, राकाँचे गटनेते अविनाश मार्डीकर, स्थायी समितीचे माजी सभापती चेतन पवार, मिलिंद बांबल, हमीद शद्दा आदींनी संजय खोडके यांचे कार्यालय गाठले. येथे प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या सूचनांबाबत चर्चा झाली. दुसरीकडे पक्षेनता बबलू शेखावत, उपमहापौर शेख जफर, स्थायी समितीचे सभापती विलास इंगोले, आसीफ तव्वकल, रतन डेंडुले, नूर खॉ आदींनी काँग्रेसनगर स्थित ‘देवीसदन’ येथे जाऊन रावसाहेब शेखावत यांची भेट घेतली. येथेही घडलेल्या घडामोडींबाबत चर्चा झाली. काँग्रेसने स्थायी समितीत सदस्य म्हणून आसिफ तव्वकल आणि कांचन डेंडुले यांची नावे निश्चित केली होती. रावसाहेब शेखावत यांनी रतन डेंडुले यांना बक्षिस देण्यासाठी काँग्रेसमधून कांचन डेंडुले यांचे नाव पाठविण्याची तयारी केली होती. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी शेखावतांच्या या खेळीला ‘ब्रेक’ दिला. (प्रतिनिधी)

Web Title: The adjournment adjourned on the notice of Congress State President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.