६२ शिक्षकांचे रिक्त जागेवर समायोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 09:54 PM2018-07-27T21:54:07+5:302018-07-27T21:54:50+5:30

जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाइन बदली प्रक्रियेत जिल्हांतर्गत बदलीतील २८ आणि जिल्हांतर्गत बदलीत अतिरिक्त ठरलेल्या २७ व उर्दू माध्यमाच्या ७ अशा एकूण ६२ शिक्षकांचे शुक्रवारी जिल्ह्यातील रिक्त असलेल्या शाळांवर समुपदेशनाद्वारा समायोजन केले आहे.

Adjusting to 62 vacancies of teachers | ६२ शिक्षकांचे रिक्त जागेवर समायोजन

६२ शिक्षकांचे रिक्त जागेवर समायोजन

Next
ठळक मुद्देबदल्या : समुपदेशनाद्वारा पदस्थापना
<p>लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाइन बदली प्रक्रियेत जिल्हांतर्गत बदलीतील २८ आणि जिल्हांतर्गत बदलीत अतिरिक्त ठरलेल्या २७ व उर्दू माध्यमाच्या ७ अशा एकूण ६२ शिक्षकांचे शुक्रवारी जिल्ह्यातील रिक्त असलेल्या शाळांवर समुपदेशनाद्वारा समायोजन केले आहे.
ही प्रक्रिया २७ जुलै रोजी झेडपीच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनात झाली. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आर.डी. तुरणकर, उपशिक्षणाधिकारी वामन बोलके उपस्थित होते.
जि.प. शिक्षकांच्या प्रथमच राज्यस्तरावरून आॅनलाइन बदल्या करण्यात आल्या आहेत. यात जिल्हांतर्गत बदलीने जिल्ह्यात ७८ शिक्षक आले आहेत. यापैकी ५१ शिक्षकांना एनआयसीकडून रँडम पद्धतीने पदस्थापना देण्यात आली आहे. परंतु, यापैकी २७ व अन्य एक अशा २८ शिक्षकांना पदस्थापना दिलेली नसल्याने आंतरजिल्हा बदलीत शिक्षकांना पदस्थापनेसाठी समायोजन करण्यात आले. जिल्हांतर्गत आॅनलाईन बदली प्रक्रियेत २८ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. यासोबतच उर्दू माध्यमाच्या सात शिक्षकांचे समायोजन करण्यात आले आहे. बदली प्रक्रियेत जिल्हाभरात रिक्त असलेल्या विविध तालुक्यातील शाळांवर पदस्थापना दिली आहे. यासाठी आंतरजिल्हा, जिल्हांतर्गत बदलीतील शिक्षकांनी झेडपीत गर्दी केली होती. या प्रक्रियासाठी पंकज गुल्हाने, तुषार पावडे, राजू झाकर्डे, चव्हाण, ऋषीकेश कोकाटे आदींनी प्रशासकीय कामकाज सांभाळले.
३० जुलैला विस्थापित शिक्षकांचे समायोजन
जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाइन बदली प्रक्रियेत विस्थापित झालेल्या १३० च्या जवळपास शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली नाही. त्यामुळे या शिक्षकांना पदस्थापना देण्यासाठी ३० जुलै रोजी समायोजनाची प्रक्रिया जिल्हा परिषदेत आयोजित करण्यात आली आहे.

Web Title: Adjusting to 62 vacancies of teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.