वीस पटसंख्येच्या शाळेतील शिक्षकांचे समायोजन; एक शिक्षकी शाळेला संघटनाचा रोष

By जितेंद्र दखने | Published: September 1, 2023 05:41 PM2023-09-01T17:41:58+5:302023-09-01T17:42:35+5:30

शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश

adjustment of twenty-fold school teachers; Union fury at a teachers school | वीस पटसंख्येच्या शाळेतील शिक्षकांचे समायोजन; एक शिक्षकी शाळेला संघटनाचा रोष

वीस पटसंख्येच्या शाळेतील शिक्षकांचे समायोजन; एक शिक्षकी शाळेला संघटनाचा रोष

googlenewsNext

अमरावती : वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांतील एका शिक्षकाचे अन्य शाळेवर समायोजन करण्यात येत आहे. याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने यांनी १४ पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

मागील शिक्षकांची काही भरती काळापासून प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे काही शाळांवर अतिरिक्त शिक्षक आहेत तर ज्या ठिकाणी गरजेचे आहे त्या शाळेवर शिक्षकच नाहीत किंवा एकाच शिक्षकावर जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहे. त्याच अनुषंगाने आता २० पर्यंत पटसंख्या असलेल्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमधील (वर्ग १ ते ५) मध्ये असलेल्या दोन सहायक शिक्षकांपैकी एकाची शैक्षणिक कामासाठी शिक्षक आवश्यक असलेल्या शाळेवर सेवा अधिग्रहित करण्यात आली आहे. तसेच काही शिक्षकांना प्रतिनियुक्तीवर शिक्षक नसलेल्या सांगितले. शाळेवर पाठविण्याचाच आदेश देण्यात आले आहेत. संबंधित शाळेत पुढील व्यवस्था होईपर्यंत शैक्षणिक वर्षा अखेरपर्यंत हो सेवा अधिग्रहित केली जाणार आहेत, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी बुद्धभूषण सोनोने यांनी सांगितले.

जिल्हाभरात पाचशे शिक्षकांचा अनुशेष

मागील कित्येक वर्षांपासून नवीन शिक्षक भरती झालेली नाही. अशातच सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे या रिक्त जागाचा अनुशेष कायम आहे. जिल्हाभरात ५०० शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे राज्य शासनाने शिक्षकांची पदभरती करणे महत्त्वाचे आहे. मात्र याकडे शासनाकडून अंमलबजावणी होत नसल्याची खंत शिक्षक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: adjustment of twenty-fold school teachers; Union fury at a teachers school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.