चांदूर रेल्वे तालुक्यातील पाच गावे प्रशासनाने केली सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:08 AM2021-05-03T04:08:10+5:302021-05-03T04:08:10+5:30
फोटो पी ०२ चांदूररेलवे चांदूर रेल्वे : ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे चांदूर रेल्वे तालुक्यातील ...
फोटो पी ०२ चांदूररेलवे
चांदूर रेल्वे : ग्रामीण भागात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यामुळे चांदूर रेल्वे तालुक्यातील पाच गावे शनिवारी सील करण्यात आली आहेत.
चांदूर रेल्वे तालुक्यातील कळमगाव, कळमजापूर, सातेफळ, मांडवा, बागापूर या गावांत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या गावांत शनिवारी तहसीलदार राजेंद्र इंगळे, ठाणेदार मगन मेहते, गटविकास अधिकारी थोरात, मंडळ अधिकारी स्थूल, लंगडे, ग्रामविस्तार अधिकारी उमक, चव्हाण, पोलीस कर्मचारी जगदीश राठोड यांच्यासह तलाठी, कोतवाल, अंगणवाडी सेविका यांनी भेट देऊन गावात फिरून कोरोनासंबंधी जनजागृती केली. गावात अन्य गावांतील लोकांनी प्रवेश करू नये, येथील लोकांनी बाहेर जाऊ नये, मास्कचा नियमित वापर करावा, इतरांसोबत गप्पा, भेटी, चर्चा टाळाव्या, सर्वांनी आरोग्याची वैयक्तीकरीत्या काळजी घ्यावी व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी गावकऱ्यांना करण्यात आले.
लोकांनी स्वयंस्फूर्तीने नियम पाळून प्रशासनाला सहकार्य केले तर लवकरच ग्रामीण भागातून कोरोना हद्दपार होऊ शकतो. तालुक्यातील कळमगाव, कळमजापूर, सातेफळ, मांडवा, बागापूर ही गावे बंद करण्यात आली असून याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.