मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यासाठी प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 01:15 AM2018-07-13T01:15:07+5:302018-07-13T01:16:09+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यासाठी येणार आहेत. मुख्यमंत्र्याचा दौरा अंबानगरीत होणार असल्याने प्रशासन सज्ज झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यासाठी येणार आहेत. मुख्यमंत्र्याचा दौरा अंबानगरीत होणार असल्याने प्रशासन सज्ज झाले आहे. पोलीस उपाआयुक्त चिन्मय पंडित व वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी गुरुवारी सांस्कृतिक भवन परिसराची पाहणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने सांस्कृतिक भवनापुढील रस्त्याचा पॅच भरला आहे.
इर्र्विन ते पंचवटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनचालकांना यू-टर्न घ्यायचा असेल, तर पंचवटी चौकातून किंवा इर्विन चौकाकडे जावे लागत होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक भवनसमोरील रस्त्याच्या मधोमध मुरुम व सिमेंट टाकून गॅप भरला आहे.
सिमेंट रस्त्याचा गॅप भरल्यामुळे व वाहनांना यू-टर्न घेण्यासाठी मार्ग दिल्याने नागरिकांची लांबचे अंतर गाठण्याच्या कटकटीतून सुटका झाली आहे. दौऱ्याची सुरक्षितता म्हणून पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, सहायक आयुक्त नीलिमा आरज, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे, गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी परिसराची पाहणी केली. यावेळी उपायुक्त चिन्मय पंडित यांनी मुख्यमंत्र्याच्या दौºयाचा आढावा घेतला.