प्रशासकीय कामकाज केवळ कोरोनावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:13 AM2021-05-18T04:13:50+5:302021-05-18T04:13:50+5:30
अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील कामकाज पूर्णत: ठप्प झाले आहे. गर्दी टाळण्याचा अनुषंगाने शासकीय कार्यालयांमध्ये केवळ आरोग्य पाणीपुरवठा ...
अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील कामकाज पूर्णत: ठप्प झाले आहे. गर्दी टाळण्याचा अनुषंगाने शासकीय कार्यालयांमध्ये केवळ आरोग्य पाणीपुरवठा आणि पंचायती तीन विभाग विभाग वगळता अन्य विभागांत कामकाज बंद आहेत. त्यामुळे शासकीय कार्यालयांत केवळ कोरोना हा एकच अजेंडा असल्याचे दिसत आहे.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयांत शुकशुकाट आहे. महत्त्वाच्या विभागांशिवाय अन्य कर्मचारी गैरहजर आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत जिल्हा परिषद विभाग बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कार्यालयातच महत्त्वाचे कामकाज सुरू आहे. सद्यस्थितीत कोरोना नियंत्रण हाच एकमेव अजेंडा प्रशासनाच्या पटलावर आहे. त्यामुळे आता उर्वरित कामे करावयाची झाल्यास संचारबंदी व लॉकडाऊन संपल्यानंतर खऱ्या अर्थाने गती येणार आहे. तोपर्यंत नागरिकांसह विकासकामांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.