४० फूट खोल विहिरीत पडलेल्या कुत्र्यासाठी लावली जीवाची बाजी; दोन युवकांची कौतुकास्पद कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 11:26 PM2021-11-03T23:26:46+5:302021-11-03T23:28:10+5:30

चाळीस फूट खोल विहिरीत दुर्घटने काढले बाहेर, रात्री दहाची घटना

admirable performance of two young men for a dog that fell into a 40 foot deep well | ४० फूट खोल विहिरीत पडलेल्या कुत्र्यासाठी लावली जीवाची बाजी; दोन युवकांची कौतुकास्पद कामगिरी

४० फूट खोल विहिरीत पडलेल्या कुत्र्यासाठी लावली जीवाची बाजी; दोन युवकांची कौतुकास्पद कामगिरी

Next

मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे (अमरावती) : एका कुत्रीमागे इतर कुत्रे धावल्याने अनावधानाने ती थेट विहिरीत पडली. रात्री दहाची वेळ असल्याने तिला वाचविणार कोण, असा प्रश्न संपूर्ण कॉलनीने केला. मात्र, त्या दोघांनी जिवाची बाजी लावत दोरखंडाच्या साह्याने ५० फूट विहिरीत उरतून आकांत करणाऱ्या पाच पिल्लाच्या आईला त्यांनी वाचविले. ही घटना बुधवारी रात्री १० वाजता दरम्यान घडली.

 बबलू द्विवेदी (३२) व शैलेश नाईक (३०) रा. हिरापूर धामनगाव येथील या दोन युवकांनी चार पिलांच्या आईला वाचविले. स्थानिक लुनावत नगर परिसरात ५० फूट खोलीची पुरातन विहीर आहे. विहिरी जवळ रात्री नऊ वाजता दरम्यान  काही कुत्रे तिच्या अंगावर धावले. दरम्यान प्राण वाचविण्याच्या ती धावली. मात्र, संतुलन बिघडल्याने ती विहितीत पडली. ही वार्ता कॉलनीत वाऱ्यासारखी पसरताच दोनशे नागरिकांची गर्दी घटनास्थळी जमली. मात्र, थंडीमुळे पडक्या विहिरीत उतरण्यास कुणीही धजावत नव्हते. अशातच सर्पमित्र बबलू द्विवेदी व शैलेश नाईक यांना पाचारण करण्यात आले. राजेश चौबे यांच्याकडून ५० फुटांचे दोरखंड कंबरेला बांधून बबलू विहिरीत उतरला. या कुत्रीला बाहेर काढले. विहिरीत जिवाच्या  आकांत करणारी कुत्री तर विहिरी बाहेर ओरडणारी ही चार पिले पाहून प्रत्येकाचे मन हेलावून गेले.  ती कुत्री बाहेर येताच पिलाजवळ गेली. दोन युवकांनी जिवाची बाजी लावत मुक्या प्राण्याला वाचविल्याने दोन्ही युवकांचे कौतुक होत आहे.
 

Web Title: admirable performance of two young men for a dog that fell into a 40 foot deep well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.