४१ पदवी, सात पदव्युत्तर महाविद्यालयांत प्रवेशाच्या जागा वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:12 AM2020-12-25T04:12:20+5:302020-12-25T04:12:20+5:30

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत पदवी अभ्यासक्रमांचे ४१ महाविद्यालय तर, सात पदव्युत्तर महाविद्यालयांच्या मागणीनुसार १० ते ३० ...

Admission to 41 degree and seven postgraduate colleges increased | ४१ पदवी, सात पदव्युत्तर महाविद्यालयांत प्रवेशाच्या जागा वाढल्या

४१ पदवी, सात पदव्युत्तर महाविद्यालयांत प्रवेशाच्या जागा वाढल्या

googlenewsNext

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत पदवी अभ्यासक्रमांचे ४१ महाविद्यालय तर, सात पदव्युत्तर महाविद्यालयांच्या मागणीनुसार १० ते ३० टकक्यापर्यंत प्रवेशाच्या जागा सन- २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात वाढविण्यात आल्या आहे. त्यानुसार कुलसचिव तुषार देशमुख यांनी पत्राद्धारे कळविले आहे.

एयआयएसएफने महाविद्यालयांत स्नातकोत्तर अभ्यासक्रम असलेल्या ४० ते ५० टक्के प्रवेशाच्या जागा वाढविण्यात याव्या, अशा मागणीचे निवेदन १६ डिसेंबर रोजी विद्यापीठाला सादर केले होते. त्यानुसार विद्यापीठाने २१ डिेसेंबर रोजी राज्य शासनाचे प्रधान सचिवांना पत्र लिहून विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांत प्रवेशाच्या जागा वाढविण्याबाबत कळविले असून, शासनाकडून मार्गदर्शन मागविले आहे. एआयएसएफ या विद्यार्थी संघटनेने प्रवेशाच्या जागा वाढविण्याची मागणी केली होती, हा आधार घेत शासनाकडे पत्रव्यवहार केला जात असल्याचे एआयएसएफचे जिल्हा सचिव योगेश चव्हाण यांनी सांगितले आहे.

Web Title: Admission to 41 degree and seven postgraduate colleges increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.