दरवाढीचा व्यापाऱ्यांनाच फायदा
By admin | Published: April 21, 2016 12:09 AM2016-04-21T00:09:01+5:302016-04-21T00:09:01+5:30
खरीपासह रबीचा हंगामात उत्पादन खर्चापेक्षा उत्पन्न कमी झाल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत आहे.
शेतकऱ्यांजवळ माल नाही : कापूस, सोयाबीन व तुरीच्या भावात तेजी
अमरावती : खरीपासह रबीचा हंगामात उत्पादन खर्चापेक्षा उत्पन्न कमी झाल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मळणी सरताच शेतमाल मिळेल त्या भावात विकला. शेतकऱ्यांच्या मालास कवडीमोल भाव मिळाला. आता शेतकऱ्यांजवळ साठवण केलेला माल नाही. मात्र बाजारात सोयाबीन, कापूस, तुरीचे भाववाढ झाली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच होत आहे.
शेतकरी आर्थिक कोंडीत असल्याने हंगामातच शेतमालाची विक्री करतात. शेतकऱ्यांच्या शेतमालाची विक्री झाल्यावर भाव वाढतात हे दरवर्षीचे चित्र आहे. यामुळे ‘वेअर हाऊस’ची संकल्पना अलिकडेच आली आहे. शेतमालास जर योग्य भाव मिळाला नाही तर शेतकरी गोदामात शेतमाल ठेऊन त्यावर कर्जस्वरुपात रक्कम घेऊन आपल अडचण भागवितात.
शेतमाल ठेवण्यासाठी थोड्याप्रमाणात भाड्याची आकारणी केली जाते. या वेअर हाऊसची निर्मितीही शेतकऱ्यांसाठीच असली तरी याचा खरा फायदा व्यापारी घेत असल्याचे दिसून येते व भाववाढ झाल्यावर व्यापारी गोदामातून माल विक्रीसाठी काढून त्याचा फायदा घेतात. घाम न गाळता मिळत असल्याने नफ्याने व्यापारी मालामाल होत आहे. शेतकऱ्यांचा माल मात्र कवडीमोल भावाने विकल्या गेला आहे.