कर्करुग्ण महिलेच्या कुटुंबाला साहस हेल्पलाईनची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:10 AM2021-07-01T04:10:34+5:302021-07-01T04:10:34+5:30
चांदूर रेल्वे : तालुक्यातील राजुरा येथे गळ्याच्या कर्करोगाने सहा महिन्यापासून अंथरुणाला खिळलेल्या एका महिलेच्या कुटुंबाला शहरातील साहस जनहितकारी बहुउद्देशीय ...
चांदूर रेल्वे : तालुक्यातील राजुरा येथे गळ्याच्या कर्करोगाने सहा महिन्यापासून अंथरुणाला खिळलेल्या एका महिलेच्या कुटुंबाला शहरातील साहस जनहितकारी बहुउद्देशीय संस्थेने मदतीचा आधार दिला. त्यांना जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा दिली व त्या महिलेच्या मुलीची बारावीपर्यंत शिक्षणाची जबाबदारी घेतल्याचे संस्थेचे अध्यक्ष चेतन भोले यांनी सांगितले.
चांदूर रेल्वे शहरात साहस बहुउद्देशीय संस्थेने लॉकडाऊनच्या काळात अनेकांना मदतीचा हात दिला आहे. राजुरा येथील निकिता वानखडे यांच्याबाबत माहिती होताच संस्थेचे अध्यक्ष चेतन भोले यांनी पुढाकार घेत त्यांना सेवाग्राम येथील हॉस्पिटलमध्ये हलविले. डॉ. क्रत्तिसागर ढोले यांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून दिली. ग्रामसेवा लोकअभियानाचे संयोजक बंडू आंबटकर यांचीसुद्धा मदत झाली. वर्धा येथे मीनल मेहताम व संभाजी बिग्रेडचे तुषार उमाळे यांनी सहकार्य केले.
===Photopath===
300621\img-20210627-wa0035.jpg
===Caption===
photo