मेळघाटात ७२ वर्षांनंतरही काळोख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 05:00 AM2019-12-26T05:00:00+5:302019-12-26T05:00:29+5:30

चिखलदरा तालुक्यातील हतरू हा अतिदुर्गम परिसर आहे. या परिसरातील अनेक गावे आजही विद्युत पुरवठा पोहोचला नसल्याने अंधारात चाचपडत आहेत. अनेक गावांना ये-जा करण्यासाठी रस्ता नाहीत. वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या सुविधांपासून येथील आदिवासी वंचित आहेत. या परिसरात नेमले जाणारे शासकीय कर्मचारी काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून आपल्या सेवेकडे पाहतात. परिणामी त्यांच्यात सेवाभाव नसल्याने सतत मुख्यालयी बेपत्ता राहत असल्याचे वास्तव आहे.

After 72 years in Melghat, it is still dark | मेळघाटात ७२ वर्षांनंतरही काळोख

मेळघाटात ७२ वर्षांनंतरही काळोख

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांपुढे मांडली व्यथा : वीज, पाणी, रस्ता देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : स्वातंत्र्याला ७२ वर्षे झाली तरीदेखील मेळघाटातील आदिवासींच्या नशिबी आलेला अंधार पुसला गेलेला नाही. आजही अतिदुर्गम हतरू परिसरातील अनेक गावांत वीजपुरवठा नाही. पायाभूत सुविधादेखील पोहोचलेल्या नाहीत तसेच कार्यान्वित केलेल्या नाहीत. आम्हाला सुविधा पुरवून समस्या सोडविण्याचे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच पंचायत समितीचे उपसभापती नानकराम ठाकरे यांनी घातले.
चिखलदरा तालुक्यातील हतरू हा अतिदुर्गम परिसर आहे. या परिसरातील अनेक गावे आजही विद्युत पुरवठा पोहोचला नसल्याने अंधारात चाचपडत आहेत. अनेक गावांना ये-जा करण्यासाठी रस्ता नाहीत. वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या सुविधांपासून येथील आदिवासी वंचित आहेत. या परिसरात नेमले जाणारे शासकीय कर्मचारी काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून आपल्या सेवेकडे पाहतात. परिणामी त्यांच्यात सेवाभाव नसल्याने सतत मुख्यालयी बेपत्ता राहत असल्याचे वास्तव आहे. तालुका किंवा जिल्हास्तरावरूनच त्यांचे कामकाज चालते. परिणामी आदिवासींना सुविधांची माहिती होत नाही. त्यांच्यापर्यंत कुठलीही योजना पोहोचत नाही. मेळघाटवर विशेष लक्ष असलेले राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथील या अतिगंभीर विषयावर लक्ष घालण्याची मागणी चिखलदरा पंचायत समितीचे उपसभापती नानकराम ठाकरे यांनी निवेदनातून केली आहे.
शिक्षक करतात ये-जा; आरोग्याची ऐशीतैशी
गावात रस्तेच नसल्याने दळणवळणाची साधने अत्यल्प आहेत. महामंडळाची बस आजही मेळघाटातील दोनशेपेक्षा अधिक गावांत पोहोचतच नसल्याचे सत्य आहे. परिणाम शाळेतील शिक्षक मुख्यालयी राहत नाहीत. त्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करण्यात यावी, तसेच हतरू प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘१०८’ रुग्णवाहिका देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. सोबतच जिल्हा परिषदेच्या शाळा आणि जारिदा, रायपूर, हतरू, डोमा येथील आश्रमशाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आदिवासी मुलांना खेळण्यासाठी साहित्य नसल्याची व्यथा मांडण्यात आली आहे.

विद्युत पुरवठ्याअभावी अंधाराचे जीवन
स्वातंत्र्यापासून आतापर्यंत मेळघाटातील अनेक आदिवासी पाड्यांपर्यंत विकासकामे पोहोचल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात एसटी बस, रस्ता, वीज, आरोग्य, शिक्षण या अत्यावश्यक असलेल्या सुविधा पोहोचल्या नाहीत. तालुक्यातील सरोवरखेडा, मारिता, बिच्छुखेडा, चुनखडी, नवलगाव, माखला, रायपूर, बोराट्याखेडा, लाखेवाडा, टेम्ब्रू, पिपल्या, बोदू अशा अनेक गावांत विद्युत पुरवठा पोहोचलाच नसल्याचे वास्तव आहे.

Web Title: After 72 years in Melghat, it is still dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.