अपघातानंतर भाविकांनी कार पेटविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 11:42 PM2018-01-21T23:42:37+5:302018-01-21T23:43:12+5:30
बहिरम यात्रेत स्वयंपाक करणाऱ्या एकास कारने धडक दिली.
आॅनलाईन लोकमत
चांदूरबाजार : बहिरम यात्रेत स्वयंपाक करणाऱ्या एकास कारने धडक दिली. यामुळे संतापलेल्या भाविकांनी कार पेटविल्याची घटना रविवारी सायंकाळी ५ वाजता घडली. या घटनेत एक व्यक्ती जखमी झाला.
प्राप्त माहितीनुसार, हिवरखेड येथील पुरुषोत्तम बागडे हे बहिरम टी-पॉइंटजवळ स्वयंपाक करीत होते. दरम्यान, कारवरील नियंत्रण सुटल्याने त्याने स्वयंपाक करणाºयास धडक दिली. यात पुरुषोत्तम जखमी झाले. घटनेनंतर भाविकांनी कारला आग लावली. जखमीला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. दरम्यान, कारचालक पसार झाला. अपघात व आगीच्या घटनेमुळे यात्रेत एकच खळबळ उडाली. शिरजगावचे ठाणेदार मुकुंद कवाडे यांनी वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. दीर्घकालीन बहिरम यात्रा पूर्ण बहरात आहे. दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत आहेत. रविवारी भाविकांचा आकडा ५० हजारांहून अधिक असतो. मात्र, त्या तुलनेत येथील सुविधा कमी पडू लागल्याचे चित्र आहे.