ब्रेकअपनंतर म्हणाला; त्याला सोड, माझ्याशी लग्न कर!

By प्रदीप भाकरे | Published: April 6, 2023 06:23 PM2023-04-06T18:23:44+5:302023-04-06T18:28:32+5:30

जीवे मारण्याची धमकी : तरूणीच्या घरापर्यंत पाठलाग

after breakup Ex boyfriend chase young woman to marry him, gives death threats | ब्रेकअपनंतर म्हणाला; त्याला सोड, माझ्याशी लग्न कर!

ब्रेकअपनंतर म्हणाला; त्याला सोड, माझ्याशी लग्न कर!

googlenewsNext

अमरावती : ब्रेकअप अन् प्रेयसीचे लग्न झाल्यानंतर देखील बॅकफुटवर न येता एका सडकसख्याहरीने पुर्वप्रेयसीचा तिच्या घरापर्यंत पाठलाग केला. तर, लग्न कर, अन्यथा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ४ एप्रिल रोजी रात्री गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी अजिंक्य विठ्ठलराव जगताप व धम्मपाल सवई (दोघेही रा. यवतमाळ) यांच्याविरूध्द विनयभंग, धमकी व शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला.

अमरावती येथे खासगी नोकरी करणाऱ्या एका तरूणीची सन २०२१ मध्ये अजिंक्य जगताप याच्यासोबत ओळख झाली होती. त्यांच्यात प्रेमसंबंध देखील बहरले. मात्र, काही कारणास्तव त्यांचे लग्न होऊ शकले नाही. दरम्यान तिचे लग्न झाल्यावर तिने अजिंक्यला मॅसेज करू नकोस, बोलू नकोस, असे समजावून सांगितले. काही दिवस तो शांत राहिला. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून त्याने तिचा पाठलाग सुरू केला. वारंवार फोन करुन तो जबरदस्तीने लग्न करण्याचे धमक्या देऊ लागल्याने तिने यापुर्वी त्याच्याविरोधात गाडगेनगर पोलिसांत तक्रार दाखल केली.

दरम्यान, ४ एप्रिल रोजी रात्री आठच्या सुमारास ती तिच्या मैत्रिणीसह मोपेडने नवसारी चौकातून घरी जात असतांना अजिंक्य जगताप व धम्मपाल सवई हे दोघे पाठलाग करत तिच्या खोलीपर्यंत पोहोचले. तिच्या खोलीसमोर दुचाकी थांबवून त्याने वाकून पाहले व तेथून निघून गेला. ती बाब तिला तिच्या घरमालकाच्या मुलीने सांगितली.

दिवसभर कॉल, मेसेज

दरम्यान त्याने दिवसभर तिला अनेक कॉल केले. टेक्स मॅसेज केले. परंतु तिने त्यावर रिप्लाय दिला नाही. पाणी डोक्यावरून गेल्याने तिने त्याला कॉल करून जाब विचारला. माझ्या रुमभोवती चकरा का मारतो, असे विचारताच त्याने तिला अश्लिल शिविगाळ केली. तथा माझ्यासोबत लग्न केले नाही, तर तुला जिवाने मारुन टाकेल अशी धमकी दिली. दिवसभराच्या त्या घटनाक्रमामुळे ती प्रचंड भेदरली. तिने ४ एप्रिल रोजी उशिरा रात्री गाडगेनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.

Web Title: after breakup Ex boyfriend chase young woman to marry him, gives death threats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.