कोरोनानानंतर आता झिका व्हायरसचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:16 AM2021-07-14T04:16:21+5:302021-07-14T04:16:21+5:30
फोटो - इंटरनेटवरून घेणे पान २ लीड संजय खासबागे वरूड : दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेचा ...
फोटो - इंटरनेटवरून घेणे
पान २ लीड
संजय खासबागे
वरूड : दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव ओसरताच आता झिका व्हायरसने तोंड वर काढले आहे. या विषाणूंचा प्रसार एडिस मच्छरांपासून होत असल्याचे संशोधनातून पुढे आले. या विषाणूच्या मुकाबल्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून, मलेरिया विभागाकड़ून फवारणीचे आदेश देण्यात आले आहेत. तशा सूचना तालुका आरोग्य अधिकरी डॉ. अमोल देशमुख यांनी अधिनस्थ यंत्रणेला दिल्या आहेत.
कोविड-१९ संपण्यापूर्वीच झिका विषाणूचा प्रसार काही भागात सुरू झाला आहे. डेंग्यू , चिकुणगुण्या सारखा हा आजार असला तरी जीवघेणा असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. सदर व्हायरस हा एडिस डासांपासून होत असल्याने नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. या विषाणूची उत्पती ही टाकाऊ टायर, वस्तू, सडलेल्या झाडाचे बुंधे, साचलेल्या पाण्याचे डबके यातून होत असल्याने नागरिकांनी कोरडा दिवस पाळणे, टाकाऊ वस्तू फेकून देणे, आजूबाजूचा परिसर साफसफाई करणे, नाली साफसफाई ठेवणे आदी बंधनकारक आहे. तालुका वैद्यकीय अधिकरी डॉ. अमोल देशमुख यांनी तालुका मलेरिया विभागाला सर्वेक्षण आणि उपाययोजनांबाबत सूचना दिल्या आहेत. कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेतही दिले आहेत. नगर परिषदा आणि ग्रामपंचायतींनीही स्वच्छतेकडे लक्ष देऊन नाल्या साफसफाई, सांडपाण्याचे डबके, उकिरडे साफसफाई करण्यास सांगितले असून, तालुक्यात प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तालुका आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. कोणीही कामचुकारपणा केल्यास हा विषाणू घातक ठरू शकतो. यामुळे प्रत्येकाचे सहकार्य अपेक्षित असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ . अमोल देशमुख यांनी सांगितले .
-------------
ही आहेत लक्षणे
एडिस प्रजातीचा डासाने चावा घेतल्याने होणाऱ्या डास चावल्याने होतो. त्यावर कोणताही उपचार किंवा लस नाही. यामध्ये ताप येणे, सांधेदुखी, डोळे लाल होणे ही या आजाराची लक्षणे आहेत.
------
या आहेत उपाययोजना
नागरिकांनी सडक्या, कुजक्या वस्तू तसेच सांडपाण्याची डबकी नाहीशी करावी. कुणाला ताप आल्यास तात्काळ सरकारी दवाखान्यात जाऊन तपासणी करून घ्यावी. आरोग्य कर्मचारी, मलेरिया, फायलेरिया विभागानेसुद्धा आपल्या कार्यक्षेत्रात सर्वेक्षण करावे.