प्राणघातक हल्ल्यानंतर अचलपूरच्या नगरसेवकाला अटकपूर्व जामीन

By admin | Published: May 4, 2016 12:39 AM2016-05-04T00:39:57+5:302016-05-04T00:39:57+5:30

अमित बटाऊवाले हत्याकांडात सध्या कारागृहात असलेला बारुद गँगचा म्होरक्या व नगरसेवक मो.शाकीरवर पाच वर्षांपूर्वी एकावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे

After the deadly attack, the corporator of Achalpur will get anticipatory bail | प्राणघातक हल्ल्यानंतर अचलपूरच्या नगरसेवकाला अटकपूर्व जामीन

प्राणघातक हल्ल्यानंतर अचलपूरच्या नगरसेवकाला अटकपूर्व जामीन

Next

अटकपूर्व जामीन : अटकेबाबत नागरिकांमध्ये संशय
अचलपूर : अमित बटाऊवाले हत्याकांडात सध्या कारागृहात असलेला बारुद गँगचा म्होरक्या व नगरसेवक मो.शाकीरवर पाच वर्षांपूर्वी एकावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे. त्याने तब्बल पाच वर्षांनंतर उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन घेतला. दरम्यानच्या काळात तो अचलपुरात फिरत होता. एवढेच नव्हे तर मो.शाकीरने अचलपूर नगर पालिकेची निवडणूक लढवून नगरसेवक बनल्यानंतर त्याची जंगी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत पोलीस बंदोबस्तही होता. तरीही पोलिसांनी त्याला अटक का केली नाही, असा प्रश्न पडला आहे.
मागील सात ते आठ वर्षांपूर्वी विद्यार्थिनींच्या छेडखानीचे प्रमाण वाढले होते. त्याचा बंदोबस्त करण्याच्या नावाखाली अचलपूर, परतवाडा शहरातील काही युवक एकत्र येऊन वाघाई देवीच्या नावाची संघटना काढण्यात आली होती. संघटनेचे कुठलेही लेखी रेकॉर्ड नव्हते या संघटनेतील काही सदस्यांचे राजकीय शत्रुत्वही होते. यातील एक सदस्य मोहन ठाकूर होता. याचेशी मो.शाकीर वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेला २९ एप्रिल २००७ रोजी काही कामानिमित्त मोहन ठाकूर एकटे उपजिल्हा रुग्णालयात आले होते. ही संधी साधून बारुद गँगच्या सदस्यांनी त्यांचेवर प्राणघातक हल्ला केला होता. यात ठाकूर गंभीर जखमी होऊन त्यांच्या पायांना अपंगत्व आले होते या हल्ल्यातील प्रमुख हल्लेखोर मो.शाकीर, मो.गुलहसन होता.
या अचलपूर पोलीस ठाण्याला गु.र.नं.३३/०७ भादवी ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. हा हल्ला झाल्यापासून तब्बल ५ वर्षे २ महीे २७ दिवसानंतर २६ जून २०१३ रोजी मो.शाकीर याने उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन घेतला होता.
हल्ल्यानंतर तो पोलिसांच्या लेखी फरार असला तरी तो शहरात बिनधास्त फिरत असे एवढेच नव्हे तर नोव्हेंबर २०११ रोजी झालेली नगर परिषदेची निवडणूक त्याने लढवली. आपला प्रतिस्पर्धी साजीद फुलारी याचा पराजय करुन तो नगरसेवक बनला, त्याची चावलमंडीतून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत पोलीसही होते.
प्राणघातक हल्ल्यासारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या मो. शाकीरला पोलिसांनी तब्बल पाच वर्षे अटक का केली नाही, पोलिसांवर राजकीय दबाव होता, पोलीस त्याला घाबरत होते की, पोलिसांचे काही हितसंबंध होते, असा संशय आता निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: After the deadly attack, the corporator of Achalpur will get anticipatory bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.