आखतवाडा ते पुसला रस्ता उठला शेतकऱ्यांच्या जिवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 01:50 AM2018-04-25T01:50:19+5:302018-04-25T01:50:19+5:30
येथून काही अंतरावर असणाºया आखतवाडा रस्त्यावर काही दिवसांपूर्वी खडीकरण करण्यात आले. मात्र, अद्यापही डांबरीकरण झाले नसल्याने हा रस्ता पूर्णत: खराब झाला आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी शेतकºयांकडून होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरपिंगळाई : येथून काही अंतरावर असणाºया आखतवाडा रस्त्यावर काही दिवसांपूर्वी खडीकरण करण्यात आले. मात्र, अद्यापही डांबरीकरण झाले नसल्याने हा रस्ता पूर्णत: खराब झाला आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी शेतकºयांकडून होत आहे.
नेरपिंगळाई, आखतवाडा, पुसला परिसरातील नागरिकांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून असल्याने घरातील सोने-नाणे तारण करून तसेच सराफाकडून पैशांची जुळवाजुळव करून शेतीची उन्हाळ्यात योग्य मशागत करून पावसाळ्यात पेरणी करतात. काही शेतकºयांची शेती आखतवाडा-पुसला रस्त्याला लागून आहे. या रस्त्याचे जिल्हा परिषद निधीतून २००४ मध्ये खडीकरण करण्यात आले. तेव्हापासून या रस्त्याकडे पाहण्याची उसंत एकाही शासकीय विभागाने वा लोकप्रतिनिधींना मिळालेली नाही. परिणामी रस्ता चालण्यायोग्यही राहिला नाही.
रस्त्याच्या डांबरीकरणाकरिता गावातील शेतकरी विलास आमले यांच्या नेतृत्वात या तहसीलदार बक्षी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शेतकरी विनोद राऊत, शंकर राऊत, कलीम पठाण, इम्रान पठाण, विश्वनाथ आमले, विजय पाटील, निवास बिडकर, संजय वानखडे, देवीदास खोडे, दादाराव माहोरे, संजय माहोरे उपस्थित होते. यावेळी शेतकºयांनी उपोषणाचा इशारा देण्यात आला.
गेल्या १२ वर्षांपासून आखतवाडा-पुसला रस्ता डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे म्हणून निवेदन देण्यात आले आहे. तात्काळ डांबरीकरण न झाल्यास असंख्य शेतकरी वर्ग उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
- विलास आमले, शेतकरी, नेरपिंगळाई