आई-वडिलांच्या निधनानंतर आजी-आजोबा करीत होते सांभाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 10:05 PM2019-02-05T22:05:50+5:302019-02-05T22:06:36+5:30

बाबा, मी जिमवरून मित्राच्या वाढदिवसाला ढाब्यावर जेवणासाठी जात आहे. माझे दोन्ही मोबाइल घरी आहेत, असे मित्राच्या मोबाइलवरून आजोबांशी शेवटचा संवाद साधणारा बॉबी बुधवारी सायंकाळनंतर परतलाच नाही. सोमवारी मध्यरात्री पंजाबराव ढाब्यानजीकच्या विहिरीत त्याचा मृतदेह आढळला. याप्रकरणी आठ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध हत्या व अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

After the parents' death, grandparents were managing | आई-वडिलांच्या निधनानंतर आजी-आजोबा करीत होते सांभाळ

आई-वडिलांच्या निधनानंतर आजी-आजोबा करीत होते सांभाळ

Next
ठळक मुद्देचार दिवसानंतर सापडला मृतदेह : वाढदिवसाला गेलेला बॉबी परतलाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : बाबा, मी जिमवरून मित्राच्या वाढदिवसाला ढाब्यावर जेवणासाठी जात आहे. माझे दोन्ही मोबाइल घरी आहेत, असे मित्राच्या मोबाइलवरून आजोबांशी शेवटचा संवाद साधणारा बॉबी बुधवारी सायंकाळनंतर परतलाच नाही. सोमवारी मध्यरात्री पंजाबराव ढाब्यानजीकच्या विहिरीत त्याचा मृतदेह आढळला. याप्रकरणी आठ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध हत्या व अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धारणी रस्त्यावरील पंजाबराव ढाब्यावर झालेल्या मारहाणीत बॉबी ऊर्फ अभिलाष प्रवीण मोहोड (१९, रा. रविनगर, परतवाडा) याची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकल्याच्या प्रकरणाने शहरात दहशत व वातावरण ढवळून निघाले आहे. हत्येचा गुन्हा व आरोपीला अटक करण्याची मागणी करीत मृतदेह उचलण्यास नातेवाइकांनी नकार दिल्याने तणाव निर्माण झाला होता. अखेर चार तासानंतर मागणी पूर्ण झाल्याने मृतदेह उचलून सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आला.
नातवंडं लहान असतानाच सुनेचे निधन झाले. काही दिवसांनी पोलीस विभागात असलेला मुलगा प्रवीण दगावला. त्यामुळे अभिलाष व त्याचा मोठा भाऊ अमित यांचा सांभाळ तळहातावरील वृद्ध आजी-आजोबांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे केला. त्यांच्यावर सोमवारी सायंकाळी बिकट प्रसंग ओढवला.
धारणी मार्गावरील पंजाबराव ढाब्यावर अमित सोनखासकर या मित्राचा वाढदिवस असल्याने सर्व जण १ फेब्रुवारीला जेवणासाठी गेले होते. जेवणातून तेथील नोकर व धाबामालकांसोबत वाद झाला. त्याचे रूपांतर हाणामारी झाले. त्यामुळे मिळेल त्या मार्गाने युवक पळत सुटले. त्यानंतर सहकारी मित्र घरी पोहोचले. मात्र, बॉबी बेपत्ता होता. सोमवारी मध्यरात्री त्याचा मृतदेह ढाब्यानजीकच्या कठडे नसलेल्या विहिरीत आढळून आला. बॉबीची हत्या करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली. तोपर्यंत मृतदेह शवविच्छेदनानंतर उपजिल्हा रुग्णालयात रोखून धरला होता.
चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नातवाचा मृतदेह एका विहिरीत आढळून आल्याच्या बातमीने आजोबा मारोतराव मोहोड यांच्या काळजाच्या ठिकऱ्या उडाल्या. वनविभागात वनपाल पदावर सेवानिवृत्त कर्मचारी मोहोड हे निवृत्त कर्मचाऱ्यांना शासनातर्फे दिली जाणारी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी संघटना चालवितात. सेवाभावी वृत्ती असूनही त्यांच्या परिवारावर असलेली काळाची क्रूर सावली हटली नाही, याबाबत हळहळ व्यक्त होत आहे.
मित्राच्या मोबाईलवर केला शेवटचा कॉल
बॉबी नेहमीप्रमाणे सायंकाळी जिममध्ये गेला होता. त्याचे दोन्ही मोबाइल घरी होते. त्याने सायंकाळी आपण ढाब्यावर जात असल्याची माहिती आजोबांना मित्राच्या मोबाईलवरून दिली. वाढदिवसाची पार्टी असल्याने रात्री ११ पर्यंत वाट पाहिली. मात्र, तो घरी परतला नाही. दुसºया दिवशी परिजनांकडे शोध घेतला. सोमवारी त्याचा मृतदेह सापडला.
हाणामारीनंतर परस्परविरोधी तक्रारी
पंजाबराव यांच्या ढाब्यावर वाढदिवसासाठी जेवायला गेलेली मित्र मंडळी व तेथील ढाबामालक यांच्यात झालेल्या हाणामारीनंतर १ फेब्रुवारी रोजी रात्रीच परस्परांविरोधात तक्रारी करण्यात आल्याची नोंद परतवाडा पोलिसांत दाखल आहे.
ड्युटीवर आला आणि भावाचा मृतदेहच आढळला
मृत बॉबी ऊर्फ अभिलाष याचा मोठा भाऊ अमित हा ग्रामीण पोलिसांत नोकरीला आहे. गेल्या काही दिवसांपासून परतवाडा येथे दंगा नियंत्रण पथकात बंदोबस्तासाठी त्यांची नेमणूक झालेली आहे. धाकटा भाऊ बॉबी हा मागील चार दिवसांपासून बेपत्ता असल्यामुळे आजी-आजोबा, आत्या, मित्रमंडळी व परिजनांसोबत भाऊ अमितसुद्धा परिसरात शोध घेत होते. सोमवारी रात्री ११ वाजता पोलिसांना विहिरीत मृतदेह आढळून आला. आई-वडिलांपश्चात भावानेही साथ सोडल्याने अमित मोहोड यांच्यासह कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे

याप्रकरणी तक्रारीवरुन खून व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
- सदानंद मानकर, ठाणेदार, परतवाडा

Web Title: After the parents' death, grandparents were managing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.