राज ठाकरे यांच्या सभेनंतर मनसेचे रेल्वे इंजिन वेगात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 11:16 AM2024-11-07T11:16:09+5:302024-11-07T11:17:37+5:30

Amravati : आरोप; पर्यटनस्थळाची दुरवस्था; अमरावतीचा विकास खुंटला

After Raj Thackeray's meeting in Amravati, the train engine of MNS is in full speed | राज ठाकरे यांच्या सभेनंतर मनसेचे रेल्वे इंजिन वेगात

After Raj Thackeray's meeting in Amravati, the train engine of MNS is in full speed

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
राज ठाकरे यांनी बुधवारी येथील सायन्स स्कोर मैदानावर 'राजगर्जना' सभेतून देश, राज्याच्या राजकारणावर सडकून टीका केली. अमरावतीशी त्यांचा स्नेह आणि जिव्हाळादेखील त्यांनी मांडला. आमदार आज येथे, उद्या तिथे यावरही प्रकाश टाकला.


सरकार कधी, कुणाचे? कोण कोणत्या पक्षात याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधले. आमदार फुटले, खोके घेतले हे सर्व जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. दिल्लीपासून तर गल्लीपर्यंतच्या समस्या, प्रश्नांना त्यांनी उजाळा दिला. काहीही असू द्या राज ठाकरे यांचे काही मुद्दे हे नागरिकांच्या मनाला स्पर्शन गेले. म्हणूनच राज ठाकरे यांच्या सभेनंतर अमरावतीत मनसेचे रेल्वे इंजिन वेगात धावेल, अशा बोलक्या प्रतिक्रिया नागरिकांच्या उमटल्या. राज ठाकरे यांना मानणारा मोठा तरुण वर्ग आहे. महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट थेट जनतेसमोर सादर करणारा नेता राज ठाकरे हे एकमात्र आहेत. बुधवारच्या सभेतही त्यांनी अमरावतीच्या ओबडधोबड विकासावर बोट ठेवले. एकदा संधी द्या विकास काय असतो, हे दाखवून देईल, असा विश्वास राज ठाकरे यांनी दर्शविला. मनसेचे आमदार हे जनतेसोबत मतदार संघात राहतील. ईतर पक्षाचे आमदार पुणे, मुंबईत स्थायिक होतात, तसे अमरावतीत होणार नाही, अशी ग्वाही देण्यास ते विसरले नाहीत. अमरावतीचे युवक युवती रोजगारासाठी पुणे, मुंबईकडे जात असल्याबाबत चिंता व्यक्त करताना राज ठाकरे यांनी लोकप्रतिधींना जबाबदार धरले. त्यामुळे मतदारांनो, हेवा वाटणारा महाराष्ट्र घडविण्यासाठी मनसेला संधी द्या, असे आवाहन राज ठाकरे यांनी केली. 


राजकमल चौकात पाकिस्तानचे झेंडे कसे? : पप्पू पाटील 
अमरावती मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार मंगेश उर्फ पप्पू पाटील यांनी बुधवारी जाहीर सभेत मनोगत व्यक्त करताना राजकमल चौकात पाकिस्तानचे झेंडे आणि पिवळी माती उधळली जाते? हा सर्व प्रकार होत असताना कोणीच काही बोलत नाही, अशी टीका त्यांनी केली. विशिष्ट समुदायाचा मोर्चा काढला जातो. दंगली घडविल्या जातात. मात्र या प्रकाराचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढला तर मनसेवर कारवाई करण्यात येते. अमरावती शहराच्या शाश्वत विकासावर आजी- माजी आमदार बोलत नाही. परंतु येत्या ५ ते ६ महिन्यात अमरावतीत आयटी पार्क आणणार, असा विश्वास पप्पू पाटील यांनी दिला.

Web Title: After Raj Thackeray's meeting in Amravati, the train engine of MNS is in full speed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.