जिल्ह्यात आगडोंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 01:01 AM2019-05-05T01:01:48+5:302019-05-05T01:02:12+5:30

शहरात शुक्रवारी रात्री एका ट्रॅव्हल्सला, तर शनिवारी नांदगावपेठ एमआयडीसीतील प्लास्टिक कंपनी व एका मोबाइल टॉवरच्या जनरेटरला भीषण आग लागली. जिल्ह्यातदेखील आगीच्या घटना घडल्या. आगडोंब विझविण्यासाठी अग्निशमन व नागरिकांनीही परिश्रम घेतले.

Agadband in the district | जिल्ह्यात आगडोंब

जिल्ह्यात आगडोंब

Next
ठळक मुद्देकोट्यवधीचा माल खाक। प्रशासनाकडून आगीबाबत दक्षता घेण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात शुक्रवारी रात्री एका ट्रॅव्हल्सला, तर शनिवारी नांदगावपेठ एमआयडीसीतील प्लास्टिक कंपनी व एका मोबाइल टॉवरच्या जनरेटरला भीषण आग लागली. जिल्ह्यातदेखील आगीच्या घटना घडल्या. आगडोंब विझविण्यासाठी अग्निशमन व नागरिकांनीही परिश्रम घेतले. या आगीत लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला.
डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयापासून २५ मीटर अंतरावर उभ्या ट्रॅव्हल्सला शुक्रवारी रात्री १०.३० वाजता आग लागली, तर शनिवारी दुपारी नांदगाव पेठ हद्दीतील सावर्डी स्थित एमआयडीसी परिसरात एका प्लास्टिकच्या कारखान्याला भीषण आग लागली. तिसरी घटना भाजीबाजार परिसरात घडली. एका इमारतीवरील मोबाइल टॉवरजवळील जनरेटरला आग लागली. या तिन्ही घटनांमुळे शहरात खळबळ उडाली. अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागले.
शॉर्ट सर्कीटने ट्रॅव्हल्सला आग
पंचवटी ते वेलकम टी-पॉइंट दरम्यान रोडवर उभ्या ट्रॅव्हल्सला शुक्रवारी रात्री १०.३० वाजता आग लागली. यामध्ये ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच २७ डी ३९११ जळून खाक झाली. घटनेच्या माहितीवरून पोलिसांनी पाचारण केले. अग्निशमनने वेळेवर पोहोचवून आग आटोक्यात आणली. त्या ठिकाणी ट्रॅव्हल्स पार्किंगची जागा नसतानाही तेथे ट्रॅव्हल्स उभी करण्यात आली होती. यापूर्वी शहरात तीन ट्रॅव्हल्स बसला अज्ञाताने आग लावली होती. त्यापूर्वी कॅम्प मार्गावरील हॉटेल महफीलसमोर तीन कार जळून खाक झाल्या होत्या. या चार महिन्यांत वाहनांना आगी लागल्याच्या घटना सर्वाधिक घडल्याचे स्पष्ट होत आहे.
प्लास्टिक कारखान्यानाला आग
सावर्डीजवळील बालाजी प्लास्टिक कंपनीला शनिवारी दुपारच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशमनला मिळाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ तीन पाण्याचे बंब घेऊन घटनास्थळ गाठले. आग आटोक्यात आणण्यासाठी पाण्याचा मारा सुरू केला. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमनला जवानांना तब्बल तीन तास अथक परिश्रम घ्यावे लागले. आगीत मोठा मुद्देमाल जळून खाक झाला आहे.
भाजीबाजार परिसरात जनरेटर भडकले
भाजीबाजार परिसरातील श्री रामचंद्र निवास या सदनिकेवर असणाऱ्या मोबाईल टॉवरच्या जनरेटरला शनिवारी दुपारी १.३० वाजता आग लागली. घटनेच्या माहितीवरून अग्निशमन दलाचे लीडिंग फायरमन सैय्यद अनवर, फायरमन चंद्रकात सूर्यवंशी, दिलीप चौखंडे, अंबाडकर, मकवाने व वाहनचालक अमिन शेख, राजू शेंडे, इम्रान खान, यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. या घटनेमुळे तेथील रहिवासी असलेले १२ कुटुंब धास्तावले होते.
अग्निशमन दलाने तिसºया माळ्यावरील फ्लॅटमध्ये राहणाºया नागरिकांना घर रिकामे करायला लावले. सिलिंडर बाहेर काढले. दोन तासांनी आग विझली. राजेश गोयनका यांनी २००५ मध्ये सदनिका निर्माण झाले. सदनिकेवर मोबाइल टॉवरला नागरिकांनी विरोध केला होता.
वीजतारांच्या स्पर्शाने टिप्पर खाक
घुईखेड : चांदूर रेल्वे तालुक्यात सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामासाठी वापरण्यात येणाºया टिप्परला जिवंत वीजतारांचा स्पर्श झाल्याने ट्रक जळून खाक झाल्याची घटना शनिवारी दुपारी १ वाजताच्या दरम्यान घुईखेड येथे घडली. घुईखेड शिवारातून गौण खनिजाची मांजरखेड (दानापूर) मार्गे ट्रकने ने-आण केली जाते. शनिवारी दुपारी आरजे १९ जीडी १४७० क्रमांकाचा टिप्पर मुरूम खाली करून परत येत असताना अचानक तारांचा स्पर्श झाला. भर उन्हात टिप्परने थेट पेट घेतला.चालक कालुराम याने कसाबसा जीव वाचविला. टिप्पर काही मिनिटामध्येच जळून खाक झाला. सदर ट्रक एनसीसी कंस्ट्रक्शनचा असून, राजस्थानातील आहे.
खानापुरात पाच घरे बेचिराख
मोर्शी : लगतच्या खानापूर येथे लागलेल्या आगीत पाच घरांची राखरांगोळी झाली. शनिवारी दुपारी ३ च्या सुमारास लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. स्पार्किंग झाल्यानंतर गवारीपुरा भागातील रहिवासी बाळू शेंद्रे, गजानन शेंद्रे, अंजनाबाई वाघाडे, दिगंबर शेंद्रे, दिवाकर चौधरी यांची घरे आगीने कवेत घेतली. श्रीनाथ महाराज यांनी मोर्शी येथील अग्निशमन विभागाला माहिती दिली. मोर्शीचे तहसीलदार गणेश माळी यांनी घटनास्थळी भेट देऊन आगग्रस्तांचे सांत्वन केले. आग विझविण्यासाठी अशोक निमजे, संदीप भदाडे, प्रदीप उमाळे, श्रीकृष्ण ढाकूलकर इत्यादींनी परिश्रम घेतले. पोलीस उपनिरीक्षक धीरज गुल्हाने, पोलीस पाटील, तलाठी व खानापूरवासीयांनी मदत केली.

Web Title: Agadband in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग