गुरुकुंज येथे पुन्हा मृतदेहाची अवहेलना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 11:03 PM2018-07-17T23:03:29+5:302018-07-17T23:03:49+5:30
येथील स्मशानभूमीचा विषय शासन दरबारी रेटून व इशारा देऊनही प्रशासनाच्या दफ्तरदिरंगाईत गुरुकुंजातील रहवासी नागरिकांच्या मृतदेहाची अवहेलना सुरूच आहे. रस्त्याच्या प्रश्नावर अधिकारी मूग गिळून बसले आहेत.
गुरुकुंज (मोझरी) : येथील स्मशानभूमीचा विषय शासन दरबारी रेटून व इशारा देऊनही प्रशासनाच्या दफ्तरदिरंगाईत गुरुकुंजातील रहवासी नागरिकांच्या मृतदेहाची अवहेलना सुरूच आहे. रस्त्याच्या प्रश्नावर अधिकारी मूग गिळून बसले आहेत.
येथील स्मशानभूमीच्या रस्त्याचा प्रश्न जटिल असून रस्त्याअभावी आजपर्यंत अनेक अंत्ययात्रा चिखलातून स्मशानभूमीपर्यंत गेल्या आहेत. येथील रहिवासी माधवराव भोयर (७०), मधुबेन हलवदिया (७२) यांचे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा मंगळवारी दुपारी १ वाजता निघाली. पण, स्मशानभूमीपर्यंत चिखल तुडवावे लागले. ज्येष्ठ नागरिकांनी याबाबत आचर्य व्यक्त करीत यात कुरघोडीचे राजकारण असल्याची शक्यता वर्तविली.