पुन्हा 'आॅपरेशन मुस्कान'

By admin | Published: March 29, 2016 12:14 AM2016-03-29T00:14:11+5:302016-03-29T00:14:11+5:30

हरवलेल्या मुलांचा शोध घेण्याकरिता शहरात पुन्हा आॅपरेशन मुस्कान ही मोहिम सुरु करण्यात येणार आहे.

Again 'Operation Smile' | पुन्हा 'आॅपरेशन मुस्कान'

पुन्हा 'आॅपरेशन मुस्कान'

Next

महासंचालकांचे आदेश : हरवलेल्या मुलांचा शोध
अमरावती : हरवलेल्या मुलांचा शोध घेण्याकरिता शहरात पुन्हा आॅपरेशन मुस्कान ही मोहिम सुरु करण्यात येणार आहे. पोलीस महासंचालकांनी राज्यभरातील पोलिसांना तसे आदेश दिले असून अमरावतीत १ एप्रिलपासून ही मोहिम सुरु केली जाणार आहे.
शहर आयुक्तालय हद्दीत १ ते ३१ जानेवारी २०१५ दरम्यान १८ वर्षांच्या आतिल हरविलेल्या १५ मुलां-मुलींचा शोध घेण्यात आला, त्यामध्ये एका मुलाचा शोध घेऊन त्याला आई-वडिलांच्या स्वाधिन करण्यात आले होते. तसेच शहरात हरविलेला एक मुलगा व तिन मुलींना आई-वडिलांच्या स्वाधिन करण्यात आले. १ ते ३१ जुलै २०१५ मध्ये ही मोहिम राबविण्यात आली. त्यामध्ये १६ मुलां-मुलींपैकी दोन मुले पोलिसांना सापडली होती. त्यांना आई-वडिलांच्या स्वाधिन करण्यात आले. तसेच अन्य ठिकाणी आढळून आलेल्या चार मुलांना बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात आले होते. आता पुन्हा १ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत आॅपरेशन मुस्कान ही मोहिम राबविली जाणार असून १८ वर्षाच्या आतिल मुलां-मुलीचा शोध घेण्यात येणार आहे. यासंदर्भात पोलीस आयुक्त लवकरच बैठक घेऊन पोलीस अधिकाऱ्यांना सुचना देणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.

Web Title: Again 'Operation Smile'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.