पुन्हा सात बळी, ३८३ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:13 AM2021-03-14T04:13:22+5:302021-03-14T04:13:22+5:30
अमरावती : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. शनिवारी पुन्हा सात कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने बळीची संख्या ५९३ ...
अमरावती : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. शनिवारी पुन्हा सात कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने बळीची संख्या ५९३ झाली आहे. शिवाय ३८३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाग्रस्तांची संख्या ४२,११४ झालेली आहे.
जिल्ह्यात शनिवारी २,६०४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात दोन महिन्यातील सर्वात कमी १४.७० पॉझिटिव्हिटी नोंदविली गेल्याने आगामी काळात कोरोनाचा संसर्ग माघारेल, अशी अपेक्षा आहे. जिल्ह्यात दोन महिन्यांपासून कोरोनाचा वाढत्या संसर्गामुळे जिल्हा व महापालिका प्रशासनाद्वारा विविध प्रकारच्या उपाययोजना राबविल्या जात आहे. याशिवाय पथकांद्वारा दंडात्मक कारवायादेखील सुरू आहेत.
जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतरच्या काळात कोरोनाग्रस्तांची नोंद ही ९०० वरून ५०० वर आलेली आहे. आता तर दोन महिन्यातील निच्चांकी पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला.
होम आयसोलेशन रुग्णांवर पथकांचा वॉच, कॉन्टक्ट ट्रेसिंग व चाचण्यांत वाढ या उपाययोजानांचे चार दिवसांत सकारात्मक परिणाम दिसायला लागल्याचे आरोग्य विभागाद्वारा सांगण्यात आले.
बॉक्स
शनिवारी कोरोनाचे सात बळी
००००००००००
००००००००००००००(कृपया जागा सोडावी. माहिती यायची आहे.