पुन्हा सहा मृत्यू, ४५७ पॅझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:12 AM2021-03-22T04:12:53+5:302021-03-22T04:12:53+5:30
अमरावती : जिल्ह्यात रविवारी सहा संक्रमितांचे मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या ६३० वर पोहोचली आहे. याशिवाय ४५७ अहवाल पॉझिटिव्ह ...
अमरावती : जिल्ह्यात रविवारी सहा संक्रमितांचे मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या ६३० वर पोहोचली आहे. याशिवाय ४५७ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४५,३९५ झालेली आहे.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसह चाचण्या वाढविण्यासाठी शासनाचे निर्देश व राज्य सेवा पूर्व परीक्षेची तयारी यामुळे या चार दिवसांत चाचण्यांची संख्यावाढ झालेली आहे. रविवारी करण्यात आलेल्या ५,२५७ कोरोना चाचण्या आतापर्यंतच्या संसर्ग काळातला उच्चांक आहे. यात ४५७ अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहे. यात ८.६९ पॉझिटिव्हिटी नोंदविण्यात आलेली आहे. या आठवड्यात चाचण्यांची संख्यावाढ झाल्यानंतरही रुग्णसंख्या ३०० ते ५०० चे दरम्यान राहिली आहे. पॉझिटिव्हिटीत सातत्याने कमी आलेली आहे. उपचारादरम्यान बरे वाटल्याने रविवारी ५४८ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आल्याने जिल्ह्यात संक्रमणमुक्त नागरिकांची संख्या ४०,४०० झालेली आहे. ही ८९ टक्केवारी आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४,३६५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
जिल्ह्यात २७ डेडीकेटेड कोरोना हॉस्पिटल, चार डेडीकेटेड कोरोना हॉस्पिटल सेंटर, १५ कोविड केअर सेंटरमध्ये ३,११४ बेडची उपलब्धी आहे. यात १,०४९ बेडवर सध्या रुग्ण आहेत व २,०६० बेड सध्या रिक्त असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली. ‘होम आयसोलेशन’मध्ये सध्या ३,२५३ रुग्ण असल्याने आरोग्य यंत्रणेवरचा ताण काहीसा कमी झालेला आहे.
बॉक्स
रविवारी सहा कोरोनामृत्यू
(कृपया तीन ओळी जागा सोडावी, माहिती यायची आहे.)