सकल मराठ्यांची पोलीस आयुक्तालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 10:42 PM2018-08-03T22:42:21+5:302018-08-03T22:44:17+5:30

'एक मराठा, लाख मराठा', 'जय जिजाऊ, जय शिवराय' अशा गगनभेदी घोषणा देत शेकडो सकल मराठाजन शुक्रवारी दुपारी पोलीस आयुक्तालयावर धडकले. पोलीस आयुक्तालयालाच पोलीस सुरक्षा देण्याची वेळ यावेळी पोलिसांवर आली. पोलीस आयुक्तांना निवेदन दिल्यावर मराठ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केली. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांनाही देण्यात आले.

The agitated Maratha police commissioner | सकल मराठ्यांची पोलीस आयुक्तालयावर धडक

सकल मराठ्यांची पोलीस आयुक्तालयावर धडक

Next
ठळक मुद्देमुद्दा अन्यायाचा : बेकायदा वास्तव्य करणाऱ्या गैरभारतीयांवर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : 'एक मराठा, लाख मराठा', 'जय जिजाऊ, जय शिवराय' अशा गगनभेदी घोषणा देत शेकडो सकल मराठाजन शुक्रवारी दुपारी पोलीस आयुक्तालयावर धडकले. पोलीस आयुक्तालयालाच पोलीस सुरक्षा देण्याची वेळ यावेळी पोलिसांवर आली. पोलीस आयुक्तांना निवेदन दिल्यावर मराठ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केली. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांनाही देण्यात आले.
अन्नात मीठ नसल्याच्या क्षुल्लक कारणावरून सिंधी समुदायाच्या काही व्यक्तींनी एकत्रित येऊन मराठा व्यावसायिकाला केलेल्या मारहाणीचा निषेध आणि जात पंचायत भरवून सामाजिक बहिष्कार टाकण्यासारख्या गंभीर कृत्यांवर पोलीस कारवाईची मागणी, हा शुक्रवारच्या 'मराठा धडके'चा हेतू होता. मावळते पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलीक तसेच जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी याप्रकरणी कारवाईचे आश्वासन 'मराठ्यां'ना दिले.
मराठा क्रांती ठोक मोर्चाची आगामी रणनिती ठरविणारी जिल्हाभरातील सकल मराठ्यांची सभा गुरुवारी अमरावतीत पार पडली. त्या सभेत शुक्रवारच्या या 'मराठा धडके'ची रुपरेषा निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार ती अंमलात आणली गेली. मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा एल्गार पुकारण्याचा निर्धार यावेळी मराठाजनांनी व्यक्त केला.
बांग्लादेशी घुसखोर, पाकिस्तानी नागरिक!
सुमारे ३००० बांग्लादेशी घुसखोरांना शहरातील सिंधी व्यावसायिकांनी आश्रय दिला आहे. त्यांना हुडकून तत्काळ कारवाई करावी. सिंधी समाजाचे २६० पाकिस्तानी नागरिक अवैधरित्या अमरावती शहरात वास्तव्यास आहेत, त्यांना मायदेशी परत पाठवावे. सिंधी नागरी वस्तीत अनेक छोटे कारखाने चालविले जातात. कर आणि वीजआकारणी व्यावसायिक श्रेणीऐवजी निवासी श्रेणीनुसार अदा केली जाते. त्यांना व्यावसायिक देयके लागू करावीत. सिटी लँड, बिझी लँड आणि ड्रीम्ज लँड या व्यावसायिक लघुशहरांची वीजपुरवठा आणि मालमत्ता कराबाबत सखोल चौकशी करण्यात यावी. सिंधी समुदायाने जात पंचायत भरवून नितीन देशमुख या मराठा समाजाच्या व्यावसायिकावर सामाजिक बहिष्कार घालण्याचा फतवा काढला. हा मुद्दा जातीय तेढ निर्माण करणारा आहे. जात पंचायत विरोधी कायदा अधिनियम २०१८ अन्वये पंचायतीच्या तमाम कार्यकारीणीवर कठोर कारवाई करण्यात यावी. सिंधी समुदायाला देण्यात आलेले भाडेपट्टे रद्द करण्यात यावे. नितीन देशमुख आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, या महत्त्वपूर्ण मागण्या यावेळी करण्यात आल्यात.
सकल मराठा म्हणतो, कारवाई हवीच
हे समुदायाचे भांडण नव्हते. हॉटेलमधील सेवेचा मुद्दा होता. सिंधी समाजाने याप्रकरणाला विनाकारण जातीय रंग दिला. खोट्या तक्रारी केल्या. सिंधी डॉक्टरांकडून खोटे एक्स-रे अहवाल मिळविले. पोलिसांवर दबाव आणला. मराठ्यांना अटक करण्यास भाग पाडले. जातपंचायती भरविल्या. बहिष्कार घातला. या शरणार्थी लोकांना भाडेपट्टे दिल्यावर त्यांचे व्यवसाय मराठा-मराठी लोकांच्या मदतीनेच उभे झालेत. मराठा समाज कायम शांतता आणि मदतीच्या भावनेने वागत आला आहे. परंतु घडलेला प्रकार लोकशाहीला न शोभणारा आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय आता माघार नाही.
बहिष्काराचा निर्णय नाही- सिंधी पंचायत
सिंधी समाजाने कोणत्याही समाजाचा वा हॉटेलचा बहिष्कार केला नसल्याचे स्थानिक कंवरनगर, रामपुरी कॅम्प, दस्तुरनगर आणि बडनेरा येथील सिंधी पंचायतींनी स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावर तशा पद्धतीच्या पोस्ट अपलोड करणाºया असामाजिक तत्त्वांचा सिंधी पंचायत जाहीर निषेध करते. बंधुभाव निर्माण करणे हाच पंचायतींचा उद्देश आहे. सिंधी पंचायतींनी महाराष्ट्राच्या विकासात मराठा आणि अन्य जातींना पावलोपावली सहकार्य केले आहे. सोशल मिडियावर सिंधी पंचायतींच्या नावावर कुणी बहिष्कार वा तत्सम मजकूर प्रसारित करीत असेल तर त्या मुद्याशी सिंधी पंचायतींचा संबंध नाही, असे पंचायतींच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकातून स्पष्ट करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण ?
३० जुलै रोजी नवाथे नगर चौकातील हॉटेल रंगोली पर्ल येथील लग्न समारंभाच्या कार्यक्रमात मेजवानीदरम्यान प्रकाश सेवानी, सुनील सेवानी, विजय पिंजाणी, पवन आहुजा, शंकर पमनानी व मनीष सिरवानी यांनी भाजीत मीठ कमी असल्याच्या कारणावरून मद्य प्राषण करून धुडगूस घातला. 'ग्राहक सेवा' हा धर्म समजून मुद्दामच समजूत काढावयास गेलेले हॉटेलचे मालक नितीन देशमुख यांना चर्चेदरम्यान अचानक नाक-डोळ्यावर बुक्कीने मारहाण सुरू केली गेली. कर्मचाºयांनाही मारहाण सुरू झाली. त्यानंतर दोन्ही पक्षांत झटापट झाली. परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या. तथापि शहर पोलिसांनी नितीन देशमुख आणि इतर चार जणांना अटक केली. मात्र, सिंधी समाजातील प्रकाश सेवानी, सुनिल सेवानी, विजय पिंजाणी, पवन आहुजा, शंकर पमनानी व मनीष सिरवानी यांच्याविरुध्द तक्रार देऊनही कारवाई करण्यात आली नाही. सिंधी समाजातील व्यापारी एकत्र आले. शहराबाहेरील सिटी लँड, बिजि लँड आणि ड्रीम्ज लँड ही सिंधी व्यावसायिकांचा भरणा असलेली व्यापारपेठ बंद ठेवली. दबावाला बळी पडून पोलीसांनी एकतर्फी कारवाई केली. हॉटेलमधील हा वाद व्यावसायिक पद्धतीने सोडविता येणारा होता. तथापि सिंधी समुदायाने त्याला जातीय रंग दिला. जाणीवपूर्वक तेढ निर्माण केली, या भावनेतून सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला.
या संघटनांचा सहभाग
संभाजी ब्रिगेड, छावा संघटना, मराठा सेवा संघ, मराठा युवक संघ, जिजाऊ ब्रिगेड, मराठा समाज बांधव, माँ जिजाऊ महिला प्रतिष्ठान, अमरावती व्यावसायिक संघ, लष्कर ए कृषक संघ या संघटनांनी सहभाग दर्शविला.

Web Title: The agitated Maratha police commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.