दापोरी येथे शेतकºयांचा चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 10:27 PM2017-11-02T22:27:06+5:302017-11-02T22:27:21+5:30
मोर्शी तालुक्यातील शेतकºयांनी विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दापोरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात गुरुवारी उत्स्फूर्त चक्काजाम आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : मोर्शी तालुक्यातील शेतकºयांनी विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दापोरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात गुरुवारी उत्स्फूर्त चक्काजाम आंदोलन केले. तहसीलदार अनिरुद्ध बक्षी यांनी गारपीटग्रस्तांच्या खात्यात १५ दिवसांत संत्रा नुकसानभरपाई जमा करण्याचे आश्वासन दिले. आंदोलनात सहभागी झालेल्या सुमारे २५० कार्यकर्त्यांनी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
शेतकºयांची कृषिपंपाची वीज जोडणी ऐन हंगामात कापल्यामुळे त्यांच्यापुढे नवे संकट उभे ठाकले आहे. महावितरणने वीजबिल वसुलीसाठी अन्यायकारक पवित्रा उचलला आहे. वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी कृषिपंपाची बिले देऊन नोटीस पाठवणे आवश्यक होते. शेतकºयांना मात्र अजूनही वीज बिल अजूनही मिळाले नाही. त्याशिवाय तालुक्यात फेब्रुवारी २०१६ मध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या संत्र्याच्या शेतीसाठी केंद्र सरकारने विशेष पॅकेज जाहीर केले. ८०० शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत. त्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वात मोर्शीपासून आठ किमी अंतरावरील दापोरी येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्याला तालुक्यातील शेतकºयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी मोर्शी-वरूड मार्गावर सुमारे ३५ बैलबंड्या लावून वाहतूक अडविण्यात आली होती. या ठिकाणी मोर्शी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता.
शेतकºयांचे म्हणणे ऐकण्यासाठी तहसीलदार अनिरुद्ध बक्षी आंदोलनस्थळी आले. १५ दिवसांत गारपीटग्रस्त शेतकºयांच्या खात्यात अनुदान जमा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यानंतर चक्काजाम आंदोलन स्थगित करण्यात आले. वीज जोडणी कापण्याची मोहीम थांबवावी, पीक विमा काढलेल्या शेतकºयांना नुकसानभरपाई, गारपीटग्रस्त शेतकºयांना तात्काळ मदत आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार बक्षी यांना देण्यात आले.
आंदोलक शेतकºयांवर गुन्हे
चक्काजाम आंदोलन करणाºया आंदोलक शेतकºयांवर कलम १३५ मु.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये देवेंद्र भुयार, नितीन ढोमणे, आशिष वानखडे, अमोल महल्ले, रवींद्र पाटील, हर्षल राऊत, स्वप्निल राऊत, ऋषीकेश राऊत, सुनील गुलाबराव केचे, प्रशांत विश्वास पन्नासे, राहुल भाकरे, महेश उदासी, रोशन भोरगडे यांच्यासह सुमारे २५० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत.