खारपाणपट्ट्यासाठी कृषी संजीवनी प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 09:55 PM2017-10-14T21:55:47+5:302017-10-14T21:56:02+5:30

लहरी हवामानामुळे शेती क्षेत्रावर होणारे परिणाम व विविध समस्यांवर मात करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे.

Agricultural Sanjeevani Project for Saltwater | खारपाणपट्ट्यासाठी कृषी संजीवनी प्रकल्प

खारपाणपट्ट्यासाठी कृषी संजीवनी प्रकल्प

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांकडून आढावा : योेजनेस गती, ३५६ गावांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लहरी हवामानामुळे शेती क्षेत्रावर होणारे परिणाम व विविध समस्यांवर मात करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. जिल्ह्याच्या खारपाणपट्ट्यातील ३५६ गावांसह एकूण ५३२ गावे या योजनेत समाविष्ट आहेत. कृषी विभागाने या कामाला गती द्यावी, असे निर्देश शुक्रवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिलेत.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या नियोजनाबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी अनिल खर्चान, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी सत्यजीत ठोसरे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या प्रकल्पातून शेती समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शेतकºयांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी सक्षम करणे व शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी प्रयत्न करणे हा उद्देश आहे. यानुषंगाने शेतमालाच्या विपणनासाठी प्रभावी प्रयत्न करावेत.
राष्ट्रीय कृषी बाजाराच्या (ई-नाम) माध्यमातून अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे ई-व्यवहाराद्वारे शेतमाल विक्रीला अनेकविध पर्याय उपलब्ध होणार आहेत.
त्याचप्रमाणे, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्य व शेतकºयांपर्यंत विविध बाजारांतील दरांची माहिती वेळेत पोहचेल, अशी समन्वय यंत्रणा निर्माण करावी, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिलेत.
प्रकल्पाचे घटक
क्षारपड व चोपण जमिनीचे व्यवस्थापन, संरक्षित शेती, पाण्याचा कार्यक्षम व शाश्वत पद्धतीने वापर, भूजल पुनर्भरण, काढणीपश्चात व्यवस्थापन, शेतकरी उत्पादक कंपन्यांना शेतीमालाचे संकलन, हाताळणी, मूल्यवृद्धी विक्री आदींबाबत सहाय्य, बियाणे वितरण प्रणालीची कार्यक्षमता वृद्धींगत करणे, पीक पद्धतीत बदल करण्याबाबत शेतकºयांना प्रोत्साहन देणे, पिकांचे हवामानाकुल वाण आदी घटकांचा या प्रकल्तात समावेश आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
शास्त्रीय निर्देशांंकाचा वापर करून प्रकल्पांतर्गत समूह पद्धतीने गावांची निवड, महसूल मंडळनिहाय उभारणी करण्यात येणाºया स्वयंचलित हवामान केंद्राकडून प्राप्त होणाºया माहितीस अनुसरून शेतकºयांना कृषी हवामान सल्ला, शिवारातील पाण्याच्या ताळेबंदानुसार पीक नियोजन, खारपाण पट्ट्यातील अकोला, अमरावती, बुलडाणा हे जिल्हे तसेच जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुका अशा ९३२ गावांचा समावेश आहे.
प्रकल्पाची उद्दिष्टे
हवामान बदलास अनुसरून कृषी पद्धती विकसित करणे.
अल्प व अत्यल्प शेतकºयांच्या कृषी उत्पादकतेत वृद्धी करणे.
शेतकºयांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषीमूल्य साखळीमध्ये त्याचा सहभाग वाढविणे.

Web Title: Agricultural Sanjeevani Project for Saltwater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.