उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा कृषीदिनी गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:10 AM2021-07-01T04:10:59+5:302021-07-01T04:10:59+5:30

अमरावती : राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून १ जुलै या कृषिदिनी जिल्हा ...

Agriculture Day honors farmers who have done remarkable work | उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा कृषीदिनी गौरव

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा कृषीदिनी गौरव

Next

अमरावती : राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून १ जुलै या कृषिदिनी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव केला जाणार आहे. यासोबतच कृषी संजीवनी मोहिमेचा समारोपसुध्दा गुरुवारी झेडपीच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात होणार आहे.

स्व.वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी केला जाते. या दिनानिमित्त कृषी क्षेत्रात नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केलेल्या शेतकऱ्यांचा गौरव जिल्हा परिषदेमार्फत केला जाणार आहे. यात कृषी क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग राबवून यशस्वीरीत्या शेती करणाऱ्या जिल्ह्यातील १५ शेतकऱ्यांचा जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष तथा कृषी सभापती विठ्ठल चव्हाण, सीईओ अविश्यांत पंडा आणि कृषी समिती सदस्यांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे. याशिवाय जिल्हा स्तरावरील रबी हंगाम पीक स्पर्धेतील रबी हरभरा सर्वसाधारण गटात खारतळेगाव येथील आशिष क्षीरसागर, अंतरगाव येथील इंदूबाई धर्माळे, संग्रामपूर भाष्कर गावंडे, रबी गहू सर्वसाधारण गटात चौसाळा येथील नितीन घनमोडे, माणिकपूर येथील तुळशीराम मोरोपे, कुलंगणा येथील गनानन पोरे आणि रब्बी गहू आदिवासी गटातून बोराळा येथील रामदास बेठे, बिजू बेठे व झिंगापूर श्रीराव चिलात्रे यांचाही गौरव कृषिदिनी करण्यात येणार आहे.

बॉक्स

बॉक्स

या प्रयोगशील शेतकऱ्यांचा गौरव

कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कापूस उत्पादक शेतकरी म्हणून आकाश कोकाटे (धानोरा कोकोट, अमरावती), सोयाबीन, तूर, कापूस व अन्य पिकांचे विक्रमी उत्पादक भूषण पाटील (निरूळ गंगामाई, ता. भातकुली), विमला साव (मार्डा, ता.तिवसा), चंद्रशेखर बंड (शिरजगाव ता. मोर्शी), सतीश कोरेडे (जसापूर ता. चांदूर बाजार), रामचंद्र खडसे (बेबळा, ता. दर्यापूर), रंगराव शिंगणे कोतेगाव, ता.अंजनगाव सुर्जी), शामकांत करडे ( येलकी पूर्णा) विनोद खेरडे (धोतरखेडा, ता.अचलपूर), सुशील नवखरे (अडगाव बु नांदगाव खंडेश्र्वर), विजय बाबर (सोनगाव ता.चांदूर रेल्वे), निखिल डुबे (आजनगाव ता.धामणगाव रेल्वे), योगेश देशमुख (टेंब्रुखेडा ता. वरूड), रामगोपाल मावस्कर (टिटंबा ता.धारणी) गणाजी जांबू (बोराळा, ता.चिलखदरा) यांचा समावेश आहे.

Web Title: Agriculture Day honors farmers who have done remarkable work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.