बोगस कपाशी बियाण्यांवर ‘कृषी’ची धाड, गुजरात कनेक्शन उघड; ३.६७ लाखांची ४४२ पॅकेट जप्त 

By गजानन उत्तमराव मोहोड | Published: June 18, 2023 02:38 PM2023-06-18T14:38:29+5:302023-06-18T14:39:09+5:30

प्राथमिक चौकशीत गुजरातमधून माल आणल्याचे समोर आले आहे.

Agriculture department raid on bogus cotton seeds, Gujarat connection exposed; 442 packets worth 3.67 lakhs seized | बोगस कपाशी बियाण्यांवर ‘कृषी’ची धाड, गुजरात कनेक्शन उघड; ३.६७ लाखांची ४४२ पॅकेट जप्त 

बोगस कपाशी बियाण्यांवर ‘कृषी’ची धाड, गुजरात कनेक्शन उघड; ३.६७ लाखांची ४४२ पॅकेट जप्त 

googlenewsNext

अमरावती : पेरणीच्या तोंडावर कपाशीच्या बोगस बियाण्यांचा जिल्ह्यात शिरकाव झाल्याचे दिसून येते. कृषी विभागानेच शनिवारी उशीरा डमी ग्राहक बनून याचा भंडाफोड केला. यामध्ये ३.६७ लाख किंमतीचे बोगस एचटीबीटीचे ४४२ पाकिटे जप्त करण्यात आली. याप्रकरणी गाडगेनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात येऊन आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. प्राथमिक चौकशीत गुजरातमधून माल आणल्याचे समोर आले आहे.

दहा दिवसांपूर्वी नेरपिंगळाई येथे प्रतिबंधित एचटीबीटीची ५० पाकीट जप्त करण्यात येत नाही तोच १७ जूनला पुन्हा कृषी विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली. अशोक भाटे (३७, रा. देशमुख लॉनजवळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. भाटे हा शनिवारी सायंकाळी सुरुची इन बारजवळ येणार असल्याची माहिती कृषी विभागाला मिळताच एसएओ राहूल सातपुते, एडीओ गोपाळराव देशमुख यांच्यासह पथकातील अधिकारी व गुन्हे शाखेचे पथकाने सापळा रचना व आरोपी येताच त्याला ताब्यात घेण्यात आले.

 त्याचे चारचाकीची पाहणी केली असता मागच्या सीटवर व डिक्कीमध्ये तसेच त्याच्या शिक्षक कॉलनीतील घरातून कपाशीच्या प्रतिबंधित बियाण्यांची ४४२ पाकीट जप्त करण्यात आली. यासोबतच वाहन आदी ८,७७,१०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत जिल्हा कृषि अधिकारी अजय तलेगावकर, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अनंत मस्करे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक दादासो पवार, कृषि अधिकारी उद्धव भायेकर, पवनकुमार ढोमणे, रविकांत उईके यांच्यासह पीएसआय राजकिरण येवले , पोहेका जावेद अहमद, दीपक सुंदरकर, गजानन ढेवले, एजाज शहा, योगेश पवार सहभागी होते.

या प्रकरणी उद्धव भायेकर यांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार दाखल केली असता आरोपी अशोक गुलाबराव भाटे याचेविरुद्ध पोलिसांनी भादंविचे कलम ४२०, बियाणे नियम १९६८ नियम ७ व ८, बियाणे (नियंत्रण) आदेश १९८३ खंड ३, ९ बियाणे अधिनियम १९६६ कलम ७(सी) पर्यावरण(संरक्षण ) अधिनियम १९८६ कलम १५ , महाराष्ट्र कापूस बियाणे २००९ कलम १२ (९) अन्वये गुन्हा नोंद केला आला.
 

Web Title: Agriculture department raid on bogus cotton seeds, Gujarat connection exposed; 442 packets worth 3.67 lakhs seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.