कृषिदूतांनी केले शेतकऱ्यांना बोंडअळी नियंत्रणावर मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:14 AM2021-09-11T04:14:52+5:302021-09-11T04:14:52+5:30
नांदगाव खंडेश्र्वर; डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या पिंपळखुटा येथील श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षात ...
नांदगाव खंडेश्र्वर; डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या पिंपळखुटा येथील श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेली प्रतीक्षा शेजे, वैभव बोंडे, राघव अळसपुरे, आदी विद्यार्थ्यांनी नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील, मोरगाव, भगुरा या गावातील शेतकऱ्यांना गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यानुभव उपक्रमांर्गत प्रशिक्षण घेऊन प्राचार्य सी. यु. पाटील, शरद नायक, पवन चिमोटे, योगेश मुंडे, आदींच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना वरील विद्यार्थ्यांनी गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणासाठी प्रात्यक्षिकाद्वारे विस्तृत माहिती दिली. कपासीचे पीक गुलाबी बोंडअळीपासून वाचविण्यासाठी विविध उपाय व नियोजनावर उपस्थितांना माहिती देण्यात आली. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसताच त्यावर कशाची फवारणी करावी या उपाययोनजा केल्यास गुलाबी बोंड अळीपासून पिकांचे संरक्षण होऊन कापसाचे बोंड निरोगी होऊ शकते. याबाबत शेतकरी नितीन थेटे, राजू थेटे, प्रवीण काळमेघ, श्रीकांत अळसपुरे, मंगेश मानकर, रूपेश मुळे, महेंद्र मुळे, राहुल काळमेघ, कार्तिक ठाकूर, शतद अंबुदरे, आदींना गुलाबी बोंड अळीपासून कपाशी पिकांचे संरक्षण कसे करावे यावर प्रतीक्षा शेजे व सहकारी विद्यार्थ्यांनी माहिती दिली.