शेती ही माणसाला माणूसपण देणारी शक्ती
By admin | Published: March 23, 2016 12:36 AM2016-03-23T00:36:02+5:302016-03-23T00:36:02+5:30
पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असे म्हटले जायचे.
विजय चव्हाळे : कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचे उद्घाटन
बडनेरा : पूर्वी उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी असे म्हटले जायचे. पुन्हा तेच दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत. मानवाला संस्कृतीची ओळख शेतीने करुन दिली आहे. शेती ही माणसाला माणूसपण मिळवून देणारी दिव्य शक्ती आहे, असे गौरवोद्गार विभागीय कृषी अधीक्षक विजय चव्हाळे यांनी काढले. ते कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर येथे आयोजित कृषी तंत्रज्ञान सप्ताह २०१६ चे उद्घाटक म्हणून बोलत होते.
मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूरचे कार्यक्रम समन्वयक के.ए. धापके तर प्रमुख अतिथी म्हणून आत्माचे संचालक रवींद्र जाधव, उपसंचालक हरी बाप्तीवाले, अशोक डोंगरे, राघव पारडकर, गिरीश निखाडे, पी.डी. देशमुख, पी. महल्ले, आशुतोष देशमुख, तापट, जयंत गायकवाड, ओमसिंह शेखावत आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात पीक वाण आणि शेतकरी हक्क संरक्षण या विषयावर गिरीश निखाडे व राघव पाराळकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तर मृदा आरोग्यामध्ये मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे महत्त्व या विषयावर पी.डी. देशमुख व पी.पी. महल्ले यांनी तांत्रिक माहिती दिली. प्रास्ताविक ओमसिंह शेखावत, संचालन अर्चना काकडे तर प्रफुल्ल महल्ले यांनी उपस्थितांच आभार मानले.
कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्राचे प्रतापय जायले, करुणाशंकर सिंह, विजय शिरभाते, प्रफुल्ल महल्ले, संतोश देशमुख, आरती येवतीकर, राहूल घोगरे, शरद अवचट, सुरेश वैद्य, सुदेश घरडे, विनायक जिराफे, कैलाश शेखावत, ज्ञानेश्वर जिराफे, योगेश महल्ले, नीलेश मुळे, सुनील जाधव, महेश वैतागे, अनिकेत खंडार, मंगेश बनसोड यांनी कार्यक्रमासाठी प्रयत्न केले. (शहर प्रतिनिधी)