कृषी उत्पन्न बाजार समिती रामभरोसे

By admin | Published: January 23, 2016 12:35 AM2016-01-23T00:35:14+5:302016-01-23T00:35:14+5:30

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध धान्याची आवक वाढली आहे. परंतु ढगाळी वातावरणात शेतकऱ्यांचे धान्य उघड्यावर ठेवण्यात आले आहे.

Agriculture Produce Market Committee Ram Bharose | कृषी उत्पन्न बाजार समिती रामभरोसे

कृषी उत्पन्न बाजार समिती रामभरोसे

Next

कोट्यवधींचे धान्य उघड्यावर : शेडमध्ये व्यापाऱ्यांचा माल, अशुद्ध पाणीपुरवठा
मनीष कहाते अमरावती
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध धान्याची आवक वाढली आहे. परंतु ढगाळी वातावरणात शेतकऱ्यांचे धान्य उघड्यावर ठेवण्यात आले आहे. मात्र व्यापाऱ्यांनी शेडमध्ये धान्य ठेवल्याने शेतकऱ्यांच्या धान्याचे पावसामुळे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.
विलासनगर स्थित कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा माल साठवणूक आणि हर्रास करण्याकरिता ७० हजार स्के. फुटाचे दोन शेड आहे. एक ५००० स्के. फुटांचा अशा तीन शेड शेतकऱ्यांच्या मालाऐवजी व्यापाऱ्यांचा माल मोठ्या प्रमाणात पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा तूर, सोयाबीन, उडीद, ज्वारी, हरभरा इत्यादी धान्य उघड्यावर पडून आहे. अवकाळी पाऊस आल्यास संपूर्ण धान्य ओले होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा नुकसानीला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र बाजार समितीत आहे.
दररोज चार कोटी रुपयांची उलाढाल होत असलेल्या बाजार समितीत ४०० दलालसह १५० व्यापारी आहेत. वर्षाला बाजार समितीला कोट्यवधींचा नफा शेतकऱ्यांच्या माध्यमातून अप्र्रत्यक्षपणे बाजार समितीला होता. परंतु त्याप्रमाणात बाजार समितीने शेतकऱ्यांना कोणत्याही सुविधा निर्माण करण्यात आल्या नाहीत. टीएमसी शेडजवळ शेतकऱ्यांसाठी पाणी पिण्याची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे शेतकरी जवळच्या हॉटेलमध्ये पाणी पिण्यासाठी जातात. शिदोरीही तिथेच खातात.
बाजार समितीचा २२ एकरांचा परिसर आहे. जिकडे- तिडके घाणच घाण आहे. परिसरात तीन धान्य साठवणुकीचे शेड, दलालांचे शेकडो दुकाने आहेत. प्रत्येक दलाल आपआपल्या दुकानांसमोर शेतकऱ्यांचा माल हर्रास करतात. मात्र शेडमध्ये व्यापाऱ्यांचे धान्याचे सुमारे ६० हजार पोते पडून आहेत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून रोज ४० हजार विविध धान्याचे पोत्याचे आवक सुरू आहे. परंतु ढगाळी वातावरण असतानाही माल उघडण्यावर आहे.

Web Title: Agriculture Produce Market Committee Ram Bharose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.