कृषिपंपांचा वीजपुरवठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 11:30 PM2017-11-01T23:30:13+5:302017-11-01T23:30:30+5:30
तालुक्यातील हजारो शेतकºयांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा ऐन आलिताच्या काळात महावितरणने खंडित केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरुड : तालुक्यातील हजारो शेतकºयांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा ऐन आलिताच्या काळात महावितरणने खंडित केला. यामुळे शेतकºयांसमोर ओलिताचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी आंदोलन करण्याची तयारी शेतकºयांनी चालविली आहे.
रबी हंगामासाठी पेरणीची लगबग असताना शेतात सिंचन करावे तरी कसे, असा प्रश्न शेतकºयांनासमोर ठाकला आहे. पाण्याअभावी चना, गव्हाची पेरणी रखडली आहे. वरुड तालुक्यात बागायती क्षेत्र ३५ हजार हेक्टरपेक्षा अधिक असून संत्रा हे मुख्य पीक आहे. २१ हजार ५०० हेक्टर जमिनीमध्ये संत्राचे पीक घेतले जाते. रबी पिकामध्ये चना, गव्हाचे मोठे उत्पादनक्षेत्र आहे. नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये गहू, चनाची पेरणी होते. कपाशी, मिरची, तूरसह आदी पालेभाज्या पिकांचेही उत्पादन घेतले जाते. शेतकºयांना सरकारने २४ तास वीज पुरवठ्याचे गाजर दाखवून दिशाभूल केली. केवळ आठ तास वीजपुरवठा मिळतो. यातही तीन-तीन दिवसाचे भाग करून दिवसा व रात्री भारनियमन करण्यात येत आहे.
तांत्रिक बिघाडही कारणीभूत
अनेकवेळा तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा होत नाही. यामुळे कृषिपंप आठ दिवसांपेक्षा अधिक काळ बंद असतो. यासंदर्भात तक्रार केल्यावर त्याची दखल घेतली जात नाही. वारंवार तक्रारी केल्यांनतर दुरुस्ती करताच बिलाची मागणी केली जाते. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. बहुधा बिघाड आलेल्या ठिकाणी शेतकरी पुढाकार घेऊन स्वत:च दुरु स्ती करीत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.
पेरणी, मळणी, सिंचन रखडले
तालुक्यात आॅक्टोबर ते जूनपर्यंत ओलिताचा हंगाम असतो. रबी पिकांसह वांगी, पालेभाज्या, लसूण, कांद्याचे रोपण केले जाते. शेतात पडून असलेल्या ज्वारी, सोयाबीनची मळणी केली जाते. वीजच नसल्याने ही सारी कामे रखडली आहेत. यावर्षी पावसाअभावी संत्राबागा गजविणे कठीण झाले आहे. थेट ट्रान्सफॉर्मरवरून वीजपुरवठा होत असल्याने सर्वच शेतकरी वेठीस धरले जात आहेत.
विदर्भाची वीज विदर्भालाच द्या
शेतकºयांना २४ तास वीजपुरवठा, कर्जमाफी, कृषी अनुदानासारखे विषय हे राजकीय नसून शेतकºयांच्या हिताचे आहेत. विदर्भातील वीज विदर्भातील शेतकºयांनाच द्यावी, तालुक्यात सक्तीने वीज देयकांची वसुली करण्याकरिता खंडित केलेला शेतकºयांच्या कृषिपंपांचा वीज पुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा, अन्यथा तालुक्यापासून तीव्र आंदोलन करणार असल्याचे शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष सुबोध मोहिते यांनी सांगितले.