कांडली परिसरात सिलिंडरची वायुगळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:16 AM2021-09-12T04:16:14+5:302021-09-12T04:16:14+5:30
गॅस एजन्सीचा नागरिकांच्या जिवाशी खेळ, समयसूचकतेने बचावले कुटुंब फोटो - सिलिंडरचा नॉब उघडताच स्फोट झाला आहे. परतवाडा : शहरातील ...
गॅस एजन्सीचा नागरिकांच्या जिवाशी खेळ, समयसूचकतेने बचावले कुटुंब
फोटो - सिलिंडरचा नॉब उघडताच स्फोट झाला आहे.
परतवाडा : शहरातील आदिशक्ती इंडियन गॅस एजन्सीचा नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा प्रकार शनिवारी सकाळी ८ वाजता नजीकच्या कांडली परिसरातील गुप्तानगर भागात उघडकीस आला. समयसूचकता पाहता सिलिंडरचा स्फोट होण्यापूर्वीच बाहेर काढल्याने घरातील चौघांसह परिसरात मोठी दुर्घटना टळली.
परतवाडा शहराला लागून कांडली ग्रामपंचायत आहे. तेथील गुप्तानगर भागात एसटी महामंडळात वाहकपदावरून सेवानिवृत्त झालेले रामदास टकोरे हे पत्नी व दोन मुलांसह राहतात. शनिवारी सकाळी ८ वाजता पत्नी मीना या चहा बनविण्यासाठी गेल्या. नवीन सिलिंडर लावण्यासाठी मुलगा निखिलने नॉब उघडताच गॅस गळती चा स्फोट झाला. पांढरे नॉब उडून छताला लागले. वायुगळती सुरू झाल्यामुळे कुटुंबीय घाबरले. परिसरातील नागरिक काही क्षणात जमा झाले. मोठा मुलगा अक्षय याने समयसूचकता पाहता, त्यावर पाण्याने चादर ओली करून झाकून सिलिंडर घराबाहेर काढले व परिसरात हवेत वायू पसरला.
--------------‘ओके’ असून गॅसगळती कशी?
गॅस सिलिंडर नियमावलीला पूर्णत: फाटा देत आदिशक्ती इंडियन गॅस एजन्सीकडून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सिलिंडरची तपासणी न करता ते दिले जात आल्याची ओरड आहे. त्याचा प्रत्यय रामदास टकोरे यांच्या निवासस्थानी आला. त्यांना दुसरे सिलिंडर देण्यात आले असल्याचे व्यवस्थापक देविदास भालेराव यांनी सांगितले
-----------मोठा अनर्थ टळला
रामदास टकोरे यांच्या मुलाने सिलिडरचा नॉब उघडताच वायुगळती सुरू झाली. तेथेच दिवा पेटत होता. त्यांनी क्षणाचा विलंब न करता सिलिंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला
कोट
सिलिंडर तपासणी करून ‘ओके’ असल्याची पावती देण्यात आली होती. सुदैवाने अप्रिय घटना झाली नाही. याची तक्रार कंपनीला करण्यात आली आहे.
- रामदास टकोरे, ग्राहक, कांडली